अकरावी प्रवेशाची नोंदणी १५ जुलैपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 02:32 AM2020-07-04T02:32:50+5:302020-07-04T02:33:26+5:30

अर्ज नोंदणीच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग १ भरायचा आहे आणि आपण भरलेली माहिती अप्रूव्ह होण्यासाठी शाळा / मार्गदर्शन केंद्रे यांची निवड करायची आहे

Eleventh admission registration from 15th July | अकरावी प्रवेशाची नोंदणी १५ जुलैपासून

अकरावी प्रवेशाची नोंदणी १५ जुलैपासून

Next

मुंबई : मुंबई उपसंचालक कार्यालयाकडून अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, १५ जुलैपासून विद्यार्थी स्वत:, पालक आणि शाळांच्या मदतीने अकरावी आॅनलाइन प्रवेशांसाठी नोंदणी करू शकतील.
आॅफलाइन प्रवेशांना मान्यता दिली जाणार नसल्याचे मुंबई उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले.

अर्ज नोंदणीच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग १ भरायचा आहे आणि आपण भरलेली माहिती अप्रूव्ह होण्यासाठी शाळा / मार्गदर्शन केंद्रे यांची निवड करायची आहे. ही प्रक्रिया त्यांना १५ जुलै ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत करता येईल. १६ जुलैपासून संबंधित शाळा व केंद्रांनी विद्यार्थ्यांचे अर्ज अप्रूव्ह करण्याची प्रक्रिया माहितीची पडताळणी करून पार पाडायची आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात अर्जाचा भाग २ म्हणजेच महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया पार पाडून अर्ज सबमिट करायचा आहे.

आरक्षणात बदल
मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरता (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित होत्या. यंदा हे प्रमाण १२ टक्के आहे. अपंग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के जागा राखीव होत्या. हे प्रमाण आता चार टक्के आहे.

Web Title: Eleventh admission registration from 15th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.