उद्घाटनावेळीच विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग

By Admin | Updated: May 21, 2015 00:07 IST2015-05-21T00:07:28+5:302015-05-21T00:07:28+5:30

उद्घाटनाच्या काही मिनिटे अगोदरच विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची घटना दिघा येथील ईश्वरनगर परिसरात घडली.

Electric Transformer Fire at the time of inauguration | उद्घाटनावेळीच विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग

उद्घाटनावेळीच विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग

१ उद्घाटनाच्या काही मिनिटे अगोदरच विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची घटना दिघा येथील ईश्वरनगर परिसरात घडली. या प्रकारात विद्युत विभागाचा एक कर्मचारी जखमी झाला असून, त्याच्यावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
२ ऐरोली विधानसभा क्षेत्रातील विजेच्या लपंडावामुळे रहिवासी त्रस्त होते. आमदार संदीप नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार हे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहे. त्याचेच उद्घाटन बुधवारी सकाळी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमानिमित्ताने तिथे परिसरातील नागरिकही जमले होते.
३ उद्घाटनाच्या काही मिनिटे अगोदर हा ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यासाठी जोमा म्हात्रे हे वीज वितरणचे कर्मचारी तिथे गेले. त्यांनी वीजपुरवठा सुरू करताच ट्रान्सफॉर्मरलगतच्या छोट्या डीपीमधून धूर निघून त्याला आग लागली. या प्रकारात म्हात्रे देखील काही
प्रमाणात होरपळले. त्यांना उपचारासाठी तत्काळ कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
४ वेळीच ही आग नियंत्रणात आल्याने संभाव्य दुर्घटना टळली. ट्रान्सफॉर्मर उभारणीदरम्यान झालेल्या हलगर्जीमुळे शॉर्टसर्किट होवून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Electric Transformer Fire at the time of inauguration