आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न

By Admin | Updated: June 16, 2015 01:13 IST2015-06-16T01:13:35+5:302015-06-16T01:13:35+5:30

आॅल इंडिया स्टेट बँक आॅफिसर्स फेडरेशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत तीन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

The dream of creating an economic powerhouse | आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न

आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न


नवी मुंबई : आॅल इंडिया स्टेट बँक आॅफिसर्स फेडरेशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत तीन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचा उद्घाटन सोहळा शनिवारी वाशी येथील सिडको प्रदर्शन संकुल येथे पार पडला. या समारंभाच्या वेळी भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केले.
या प्रसंगी आॅल इंडिया स्टेट बँक आॅफिसर्स फेडरेशनच्या आजवरच्या कामगिरीचा संक्षिप्त आढावा घेण्यात आला तसेच यापुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. जन-धन योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा योजना यशस्वीपणे राबविण्यात आल्याने या संस्थेत कार्यरत असलेल्या सर्वच अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे या ठिकाणी कौतुक करण्यात आले. या सोहळ्यात पाच हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या सुवर्ण महोत्सवी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
आॅल इंडिया स्टेट बँक स्टाफ फेडरेशनचे सरचिटणीस एम. व्ही. मुरली, आॅल इंडिया स्टेट बँक कन्फेडरेशनचे सरचिटणीस हरविंदर सिंग तसेच आॅल इंडिया स्टेट बँक आॅफिसर्स फेडरेशनचे अध्यक्ष एम. श्रीनाथ, स्टेट बँक आॅफ इंडियाचे देशभरातील अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The dream of creating an economic powerhouse