कर्जमुक्ती हा तर केवळ प्रथमोपचार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 05:34 AM2020-02-16T05:34:48+5:302020-02-16T05:35:42+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे । जैन इरिगेशनच्या पुरस्काराचे वितरण

Debt relief is only first aid - Chief Minister Uddhav Thackeray | कर्जमुक्ती हा तर केवळ प्रथमोपचार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कर्जमुक्ती हा तर केवळ प्रथमोपचार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next

जळगाव : कर्जमुक्ती हा केवळ प्रथोमपचार आहे. यातून शेतकऱ्यांना कायमचा दिलासा मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सुरुवात करीत आहोत. मूळ आजारातून शेतकºयांना बाहेर काढायचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले.

जैन इरिगेशनतर्फे दिला जाणारा सन २०१८ साठीचा अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार दत्तात्रय भानुदासराव चव्हाण व त्यांच्या पत्नी चंद्रकला चव्हाण (रा. नंदापूर जि. जालना) यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कामगार
मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, भवरलाल जैन यांनी शेतकºयांना उभे करण्यासाठी आयुष्यभर धडपड केली. शेतकºयांचे जीवनमान बदलले तर देशाचे स्वरुप बदलल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी दिलेल्या सत्तेचा वापर लोकांसाठी केला जाईल, यासाठी आपली साथ आवश्यक असल्याची हाक त्यांनी दिली.
प्रास्ताविकात जैन इरिगेशनचे व्हाईस चेअरमन अनिल जैन यांनी विविध राज्य सरकारकडे कंपनीचे १५00 कोटी अडकले असल्याचे सांगितले.

पहिले आप...
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सत्काराची घोषणा सूत्रसंचालकाने करताच ठाकरे यांनी पवार यांचा आधी सत्कार करण्याची सूचना केली. त्यावर पवार यांनी आधी ठाकरे यांचाच सत्कार करावा, असे सूचविले. त्यावर दोघाही मान्यवरांचा एकाचवेळी सत्कार झाला. ठाकरे यांचा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी तर पवार यांचा कवी ना. धो. महानोर यांनी सत्कार केला.

वाघावरून मारले खडसेंना टोमणे
मुक्ताईनगर तालुक्यातील वाघांचा अधिवास आणि व्याघ्र प्रकल्प यावरून शनिवारी दुपारी मुक्ताईनगरला झालेल्या शेतकरी मेळाव्यात उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी एकनाथ खडसे व भाजपच्या नेत्यांच्या टोमणे मारले.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविली व खडसे यांची कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे यांचा पराभव केला. त्यावर दोन्ही नेत्यांनी भाजपला जोरदार टोमणे मारले.

Web Title: Debt relief is only first aid - Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.