दादरमध्ये एसटीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: August 31, 2015 03:06 IST2015-08-31T03:06:27+5:302015-08-31T03:06:27+5:30

भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने महिलेला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दादर परिसरात घडली. याबाबत भोईवाडा पोलिसांनी गुन्हा

Death of a woman in Dadar Dhadar | दादरमध्ये एसटीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

दादरमध्ये एसटीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुंबई : भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने महिलेला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दादर परिसरात घडली. याबाबत भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एसटीचालकाला अटक केली आहे.
परेल बस डेपोमधून शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास शिर्डीला जाण्यासाठी ही बस निघाली होती. ती दादर परिसरात येत असतानाच येथील मिनर्वा मेन्शन परिसरात महिला रस्ता पार करीत होती. अचानक बसच्या समोर आल्याने ब्रेक लावण्याधीच बसने महिलेला धडक दिली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. स्थानिकांनी तिला तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही.
घटनेची माहिती भोईवाडा पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करीत एसटीचालकाला अटक केली. अशाच प्रकारे वांद्रे परिसरात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री १च्या सुमारास हा तरुण रस्ता पार करीत असताना अज्ञात वाहनचालकाने त्याला धडक देऊन पळ काढला. (प्रतिनिधी)

Web Title: Death of a woman in Dadar Dhadar