मारहाणीत युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: May 30, 2015 01:55 IST2015-05-30T01:55:56+5:302015-05-30T01:55:56+5:30

अल्पवयीन आरोपीच्या मृत्यूप्रकरणी शिवाजीपार्क पोलिसांनी माटुंग्याच्या डेव्हीड ससून बालसुधार गृहातील १२ जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

Death of a brilliant boy | मारहाणीत युवकाचा मृत्यू

मारहाणीत युवकाचा मृत्यू

मुंबई : अल्पवयीन आरोपीच्या मृत्यूप्रकरणी शिवाजीपार्क पोलिसांनी माटुंग्याच्या डेव्हीड ससून बालसुधार गृहातील १२ जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. या सर्वांची बालसुधार गृहात जाऊन चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने शिवाजीपार्क पोलिसांना दिले आहेत.
पवईच्या मिलिंद नगरमध्ये राहाणाऱ्या समीर खान (नाव बदलले आहे) या १७ वर्षांच्या तरूणाला पोलिसांनी १७ एप्रिलला चोरीप्रकरणात अटक केली होती. पुढे त्याला ससून बालसुधारगृहात धाडण्यात आले. २० मे रोजी त्याला न्यायालयाने जामीनावर सोडले. मात्र न्यायालयात आलेला समीर अर्धमेल्या अवस्थेत होता, असे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. जामीन मिळताच त्याला राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. २३ मे रोजी समीरची प्रकृती आणखी खालावल्याने त्याला नायर रूग्णालयात हलविण्यात आले. २४ मे रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपुर्वी त्याने सुधारगृहातील दोन अल्पवयीन आरोपींची नावे घेतली होती. याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ज्युवेनाईल कोर्टाने दिले आहेत. त्यानंतरच १२ जणांना पोलीस कोठडीत आणून चौकशीच्या परवानगीबाबत युक्तिवाद होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला दिली.

Web Title: Death of a brilliant boy