डहाणूच्या किनारपट्टी लगत धुप प्रतिबंधक बंधारा

By Admin | Updated: September 6, 2014 23:05 IST2014-09-06T23:05:14+5:302014-09-06T23:05:14+5:30

गेल्या दहा वर्षापासून डहाणू समुद्रकिना:यालगतच्या मच्छीमार पाडय़ाच्या वस्तीला प्रत्येक पावसाळ्यात तसेच समुद्राच्या भरतीच्या वेळेस जबरदस्त लाटांच्या सामना करावा लागत होता.

Dahunu coastline bunds restriction | डहाणूच्या किनारपट्टी लगत धुप प्रतिबंधक बंधारा

डहाणूच्या किनारपट्टी लगत धुप प्रतिबंधक बंधारा

शौकत शेख ल्ल डहाणू
गेल्या दहा वर्षापासून डहाणू समुद्रकिना:यालगतच्या मच्छीमार पाडय़ाच्या वस्तीला प्रत्येक पावसाळ्यात तसेच समुद्राच्या  भरतीच्या वेळेस जबरदस्त लाटांच्या सामना करावा लागत होता. त्यामुळे स्थानिकांच्या घरांचे प्रचंड नुकसान होत होते. याबाबतीत किनारपट्टीवरील ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलन तसेच मोर्चे काढून किनारपट्टीवर धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी केली जात होती. अखेरीस दिवादांडी ते सतीपाडा र्पयत पाचशे मीटर लांबीचा संरक्षण बंधारा बांधण्याच्या योजनेसाठी मेरीटाईम बोर्डाने मंजुरी दिली असून त्यासाठी पाच कोटीचा निधी मंजुर केल्याने नागरीकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
डहाणूच्या समुद्र किना:यावरील सोनापुर, मांगेळ आळी, किर्तने बंगला, दुबळपाडा, सतीपाडा, आगर, नरपड या भागात मोठय़ा प्रमाणात मच्छीमार बांधव राहत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून किनारपट्टीवर असलेला धुपप्रतिबंधक बंधारा जमीनदोस्त झाल्याने समुद्राच्या उधाणाच्या वेळी लाटांचा मारा थेट वस्तीवर होत होता. शिवाय पावसाळ्याच्या दिवसात तर किनारपट्टीवरील असंख्य कुटूंबांना घर खाली करून सुरक्षित ठिकाणी जात होती. सन 1991 पासून 2क्क्2 र्पयत एकुण 65 घरे उध्वस्त झाली होती.
दरम्यान समुद्रकिना:याची होणारी धुप त्वरीत थांबवण्यासाठी उपाययोजना राबवावी आणि किना:याभोवती संरक्षक धुप प्रतिबंधक बंधारा बांधावा अशी मागणी वेळोवेळी ग्रामस्थांकडून केली जात होती. अखेरीस गेल्या मार्च महिन्यात मेरी टाईम बोर्डाच्या एका पथकाने डहाणू किनारपट्टीची पाहणी करून शासनाला अहवाल सादर केले होते. याबाबत किनारपट्टीवरील दिवादांडी ते सतीपाडा र्पयत पाचशे मीटरचा धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्याच्या योजनेसाठी मेरी टाईम मोर्डाने पाच कोटीचा निधी मंजुर केला  लवकरच कामास सुरुवात होईल.

 

Web Title: Dahunu coastline bunds restriction