राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST2021-02-05T04:25:16+5:302021-02-05T04:25:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात दिवसभरात ३ हजार २८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ...

The cure rate in the state is 95.26 percent | राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२६ टक्के

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२६ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात दिवसभरात ३ हजार २८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १९ लाख ३२ हजार २९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२६ टक्के झाले आहे. सध्या राज्यात ४३ हजार ७०१ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात सोमवारी १ हजार ९४८ रुग्ण आणि २७ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २० लाख २८ हजार ३४७ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार १०९ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या २७ मृत्यूंपैकी १५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर सहा मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित सहा मृत्यू हे एक आठव्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. राज्यात मृत्युदर २.५२ टक्के असून सोमवारी नोंद झालेल्या २७ मृत्यूंमध्ये मुंबई ९, नाशिक ४, जळगाव १, पुणे मनपा १, सोलापूर मनपा १, अकोला १, अकोला मनपा ३, अमरावती १, बुलडाणा २, वाशिम १, नागपूर मनपा १, वर्धा १ या रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४६ लाख ५६ हजार २२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.८४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९२ हजार ३८२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २ हजार १५२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Web Title: The cure rate in the state is 95.26 percent