Coronavirus: राज्य पोलीस दलात कोरोनाचा दुसरा बळी, खाकी वर्दीतला 'माणूस' काळजीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 01:16 PM2020-04-26T13:16:55+5:302020-04-26T13:18:09+5:30

शहरात ४६ लहान मोठ्या पोलीस वसाहती आहेत. मरोळ, नायगाव आणि वरळी या तीन ठिकाणी मोठया पोलीस वसाहती असून तेथे हजारो पोलीस अधिकारी, अंमलदार कु टुंबासह वास्तव्य करतात.

Coronavirus: Corona's second death in maharashtra police force, 'man' in khaki uniform worried about corona in mumbai MMG | Coronavirus: राज्य पोलीस दलात कोरोनाचा दुसरा बळी, खाकी वर्दीतला 'माणूस' काळजीत

Coronavirus: राज्य पोलीस दलात कोरोनाचा दुसरा बळी, खाकी वर्दीतला 'माणूस' काळजीत

Next

मनिषा म्हात्रे

मुंबई :  कोरोनाने राज्य पोलीस दलातला रविवारी दुसरा बळी घेतला आहे. यात वाकोला पोलीस पाठोपाठ मुंबईतील ५३ वर्षीय पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पोलिसांमध्ये कोरोनाची दहशत वाढली आहे. राज्यभरात कर्तव्य बजावत असताना सर्वाधिक पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकत आहे. शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात ९६ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली. यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ३ अधिकारी आणि ४ पोलीस यातून बरे झाले असून अन्य पोलिसांवर उपचार सुरु आहेत. यात सर्वाधिक फटका मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना बसताना दिसत आहे. 

शहरात ४६ लहान मोठ्या पोलीस वसाहती आहेत. मरोळ, नायगाव आणि वरळी या तीन ठिकाणी मोठया पोलीस वसाहती असून तेथे हजारो पोलीस अधिकारी, अंमलदार कु टुंबासह वास्तव्य करतात. त्यात लॉकडाउन, जमावबंदी आदेशाच्या अंमलबजावणीसह महापालिके च्या कस्तुरबा रुग्णलयातील सुरक्षा व्यवस्था, चाचणीसाठी आलेल्या किं वा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या, नातेवाईकांची नोंदणी, रुग्णाचा मृत्यू झाल्यास पंचनाम्यापाूसन अंत्यविधींपर्यंतची जबाबदारी, विलगीकरण केंद्रांबाहेरील बंदोबस्त, होम क्वारंटाईनचे शिक्के  असलेल्या व्यक्ती स्थानबद्ध आहेत ना याची खातरजमा, दिल्लीतील धार्मिक संमेलनातून परतलेल्या व्यक्तींचा शोध, लागण झालेल्या वस्त्या किं वा इमारती पालिके ने ताब्यात घेतल्यानंतर तेथील बंदोबस्त आदी सर्वच जबाबदाºया पोलिसांवर आहेत. यात पोलीस ठाण्यात कार्यरत मनुष्यबळावर सर्वाधिक ताण आहे. 

या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडलेली व्यक्ती सुखरूप आणि संसर्गाची लागण न होता परतेल का हे दडपण या पोलीस वसाहतींवर आहे. त्यात दोन दिवसांत दोन पोलिसांचा बळी गेल्याने पोलीस दलात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसऱ्या बळीबाबत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ट्वीट द्वारे माहिती दिली. संबंधित संबंधित पोलीस हवालदार संरक्षण शाखेत कार्यरत असून  नवी मुंबईतील कामोठे भागातील रहिवासी आहे. २३ एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच उपचारासाठी नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान रविवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. सबंधित पोलिसाच्या कुटुबियांना क्वॉरंटाइन  करत ते राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे.

बाबाच्या अंत्यसंस्कारानंतर मृत्यू झाल्याचे समजले...

वाकोला पोलीस ठाण्यातील ५८ वर्षीय पोलीस शिपायाच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियाना मिळाली होती. मुलाने दिलेल्या माहितीत, सुरूवातीला ताप खोकल्यामुळे वडिलांना कस्तुरबा रुग्णालयात नेले होते. कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांना चाचणी करण्यास सांगितले. मात्र चाचणी केली नाही. पुढे स्थानिक डॉक्टर कडून उपचार सुरु झाले. ताप वाढल्याने नायर रुग्णालयात दाखल केले. तेथे चाचणी करत  त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांचा अहवाल आला. त्यात त्यांना कोरोनाची लागण होती, हे स्पष्ट केले गेले. त्याच संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालयाच्या मोबाईल क्रमांकावरील घोळामुळे कुटुंबियाशी संपर्क झाला नाही. वडिलांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलीस दलाकडून त्यांच्या मृत्यूबाबत समजले होते. मात्र आपली कुठलीही तक्रार नसल्याचेही त्याने नमूद केले. 


असाही प्रकार...
कुर्ला वाहतूक विभागातील कोरोनाबाधित पोलिसावर उपचार करण्यास राजावाड़ी, कस्तुरबा, नायर, केईएम रुग्णालयाने टाळाटाळ केली होती. अखेर वरिष्ठाच्या हस्तक्षेपानंतर केईएममध्ये त्यांच्यावर उपचार सुरु झाले.


कोरोना चाचणीची मागणी
बंदोबस्ताला असलेल्या प्रत्येक पोलिसांची कोरोना चाचणी व्हावी अशी मागणी पोलिसांकडून होत आहे. मात्र त्याकडे वरिष्ठ दुर्लक्ष करत असल्याने हे प्रकार वाढत असल्याचा आरोप पोलिसांकडून होत आहे.


असाही धोका...
बांगुरनगर पोलिसांनी अटक केलेला सराईत गुन्हेगार दोन दिववाच्य कोठडीनंतर कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने तपास करणाऱ्या २० ते २५ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कोर्ट परिसरातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पुढे आरोपीला पकड़ायचे तर कसे ही भिती देखील निर्माण झाली आहे.

आधी कर्करोगाशी लढ़ा..
तीन वर्षापूर्वी हे हवालदार कर्करोगाने ग्रस्त होते. २०१७ पर्यन्त त्यांनी त्यावर उपचार घेतले. त्यातून ते पुन्हा उभे राहिले. पुढे कोरोना विरुद्धच्या लढयात ते नवी मुंबईवरून दक्षिण मुंबईत असलेल्या कार्यालयाकडे अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु करण्यात आलेल्या बसने प्रवास करत होते. त्यांच्या मृत्यूने सर्वानाच धक्का बसला आहे.

Web Title: Coronavirus: Corona's second death in maharashtra police force, 'man' in khaki uniform worried about corona in mumbai MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.