Corona vaccine: Long queues for vaccinations outside Nesco | Corona vaccine : नेस्कोच्या बाहेर लसीकरणासाठी लांबच लांब रांगा

Corona vaccine : नेस्कोच्या बाहेर लसीकरणासाठी लांबच लांब रांगा

मुंबई - एकीकडे मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपला आहे.त्यामुळे लवकर लस मिळण्यासाठी आज गोरेगाव पूर्व येथील नेस्को कोविड सेंटरच्या बाहेर लसीकरणासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या नेस्को कोविड सेंटरच्या बाहेर रांग गेली होती. तर अनेकांनी लसीकरणासाठी पहाटे 5 पासून रांगा लावल्या होत्या. नेस्को कोविड सेंटरमध्ये तीन दिवस इतका लसीचा साठा उपलब्ध  असल्याची माहिती येथील अधिष्ठाता डॉ.नीलम अंद्राडे यांनी दिली होती. सदर वृत्त आज लोकमतने दिले होते.

आम्ही सकाळी 8.15 वाजता  लसीकरणासाठी नंबर लावला आणि 10.30 वाजता लस घेतली अशी माहिती वसईच्या संध्या भाटकर यांनी दिली. नेस्को  येथे लसीकरणाची व्यवस्था सुरळीत सुरू होती.  लस घेतल्या नंतर नागरिकांसाठी चहा,कॉफ़ी आणि पाण्याची व्यवस्था होती. अनेक नागरिक व महिला येथील सेल्फी पॉईंटवर आपल्या मोबाईल मध्ये फोटो बंदिस्त करत होते.तर लस घेतल्यावर प्रमाणपत्र एसएमएस द्वारे मोबाईल वर लगेच आले अशी माहिती संध्या भाटकर यांनी दिली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona vaccine: Long queues for vaccinations outside Nesco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.