उपनगरात सुरू होणार कूपर वैद्यकीय महाविद्यालय

By Admin | Updated: June 17, 2015 03:00 IST2015-06-17T03:00:49+5:302015-06-17T03:00:49+5:30

केंद्रीय आरोग्य मंत्रालायकडून विलेपार्ले येथील कूपर वैद्यकीय महाविद्यालयासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. या निमित्ताने मुंबई

Cooper medical college will be started in the suburbs | उपनगरात सुरू होणार कूपर वैद्यकीय महाविद्यालय

उपनगरात सुरू होणार कूपर वैद्यकीय महाविद्यालय

मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालायकडून विलेपार्ले येथील कूपर वैद्यकीय महाविद्यालयासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. या निमित्ताने मुंबई पश्चिम उपनगरांत पहिलेवहिले वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयात १५० जागा असणार आहेत.
१९६४ मध्ये लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय मुंबईत सुरू झाले होते. त्यानंतर तब्बल ५१ वर्षांनी महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू होणार आहे. पहिल्या फेरीतच या महाविद्यालयातील सर्व जागा भरल्या जातील, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना वाटते. पहिल्या फेरीत जागा भरल्या नाहीत, तर दुसऱ्या फेरीत विचार करण्यात यावा, असे महापालिका वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला सांगणार आहे. महापालिकेच्या नायर, केईएम आणि सायन वैद्यकीय महाविद्यालयांतील ५४ प्राध्यापकांना आधीच या महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे. अजून १८ प्राध्यापक आणि सह प्राध्यापकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. महाविद्यालय सुरू होईल तेव्हा येथे २१ विभाग असणार आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. या महाविद्यालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. ६४० खाटांच्या कूपर रुग्णालयाशी हे वैद्यकीय महाविद्यालय संलग्न आहे. महाविद्यालयाला मान्यता देण्यासाठी तीन वेळा पाहणी करण्यात आली होती. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने मंत्रालयाला अहवाल मागच्या आठवड्यात दिला होता.

Web Title: Cooper medical college will be started in the suburbs