ठेकेदारांकडून पालिकेच्या तिजोरीची सफाई

By Admin | Updated: June 3, 2015 04:06 IST2015-06-03T04:06:37+5:302015-06-03T04:06:37+5:30

ठाणे - बेलापूर, पामबीचसह शहरातील प्रमुख रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी महापालिका प्रत्येक महिन्याला ५० ते ६० लाख रुपये खर्च करत आहे.

Cleanliness of the bank's safe from contractors | ठेकेदारांकडून पालिकेच्या तिजोरीची सफाई

ठेकेदारांकडून पालिकेच्या तिजोरीची सफाई

नवी मुंबई : ठाणे - बेलापूर, पामबीचसह शहरातील प्रमुख रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी महापालिका प्रत्येक महिन्याला ५० ते ६० लाख रुपये खर्च करत आहे. ठेकेदार कामचुकारपणा करत असून अनेक वेळा वाहने फक्त किलोमीटर वाढविण्यासाठी रोडवरून फिरविली जात आहेत. यामुळे रोडऐवजी महापालिकेच्या तिजोरीची सफाई होऊ लागली आहे.
नवी मुंबईमधील ठाणे - बेलापूर, पामबीच व इतर काँक्रीटच्या रोडची यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी महापालिकेने परिमंडळनिहाय दोन ठेकेदारांची नियुक्ती केली. ठेकेदाराने या रोडच्या दोन्ही बाजूंनी सफाई करणे आवश्यक आहे. सफाई करणारी वाहने रोडच्या बाजूला असणारा कचरा साफ करून त्यावर पाण्याचा शिडकावा करतात. प्रमुख रोडवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी आॅक्टोबर २०१२ पासून हे काम सुरू आहे. मात्र अनेक वेळा ही वाहने धूळ साफ न करता रोडवरून जात असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे. फक्त किलोमीटर वाढविण्यासाठीच वाहने धावत आहेत. मागील काही दिवसांपासून पामबीच रोडवर डाव्या बाजूला रोडच्या कडेने साफसफाई करण्याऐवजी यांत्रिक वाहन दोन ते तीन फूट अंतरावरून चालविले जात आहे. वास्तविक ज्या ठिकाणावरून वाहने चालविली जात आहेत तेथे धूळ व कचरा काहीच नसतो. यामुळे कचरा साफ केला जात नसताना ठेकेदारास बिल द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे ठेकेदाराच्या कामावर देखरेखीसाठी महापालिकेचा एकही कर्मचारी उपस्थित नसतो. (प्रतिनिधी)

Web Title: Cleanliness of the bank's safe from contractors