हेलिकॉप्टर भरकटले!

By Admin | Updated: May 30, 2015 02:08 IST2015-05-30T02:08:26+5:302015-05-30T02:08:26+5:30

अक्षांश आणि रेखांशाची माहिती व्यवस्थित न मिळाल्याने राज्यपालांचे हेलिकॉप्टर भरकटले आणि तेलंगण राज्यात गेले़ होते.

Chopper fired! | हेलिकॉप्टर भरकटले!

हेलिकॉप्टर भरकटले!

नांदेड : अक्षांश आणि रेखांशाची माहिती व्यवस्थित न मिळाल्याने राज्यपालांचे हेलिकॉप्टर भरकटले आणि तेलंगण राज्यात गेले़ पण वैमानिकाने प्रसंगावधान राखत अनुभवाच्या बळावर नियोजित ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवल्याने पोलीस, प्रशासनासह सर्वांचाच जीव भांड्यात पडला़ हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला़
नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील जवरला येथे राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांचा आदिवासी बांधवांशी संवाद आणि पेसा कायद्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता़

माझे हेलिकॉप्टर तेलंगणामध्ये गेले होते़ परंतु तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि पायलटची हुशारी यामुळे मी तुमच्यासमोर आज सुखरूप पोहोचलो़
- सी़ विद्यासागर राव, राज्यपाल

Web Title: Chopper fired!