मुंबईतील काळाघोडा परिसरात इमारतीचा भाग कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 20:40 IST2018-07-15T20:39:59+5:302018-07-15T20:40:58+5:30

मुंबईतील काळाघोडा परिसरात असलेल्या एका इमारतीचा भाग कोसळल्याचे वृत्त आहे. 

The building collapsed in the Kalghoda area of ​​Mumbai | मुंबईतील काळाघोडा परिसरात इमारतीचा भाग कोसळला

मुंबईतील काळाघोडा परिसरात इमारतीचा भाग कोसळला

मुंबई : मुंबईतील काळाघोडा परिसरात असलेल्या एका इमारतीचा भाग कोसळल्याचे वृत्त आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आज दिवसभर पावसाची संततधार सुरुच आहे. या पावसामुळे दक्षिण मुंबईत असलेल्या काळा घोडा परिसरातील एका जुन्या इमारतीचा काहीसा भाग कोसळला आहे. ही घटना रात्री सात वाजताच्या सुमारास घडली. 

घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. दरम्यान, इमारतीखाली असलेल्या एका वाहनाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र, या इमारतीतून 15 ते 20 लोकांनी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. 

Web Title: The building collapsed in the Kalghoda area of ​​Mumbai