BMC Election Result 2026: मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:34 IST2026-01-16T11:33:36+5:302026-01-16T11:34:58+5:30
Mumbai BMC Election Result 2026 News: अटीतटीच्या लढतीत बाजी या प्रभागात काँग्रेस, मनसे आणि भाजप यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळाली. सुरुवातीच्या फेरीपासूनच आशा काळे यांनी आघाडी घेतली होती.

BMC Election Result 2026: मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसने आपले खाते उघडले आहे. दक्षिण मध्य मुंबईतील धारावी परिसरातील प्रभाग क्रमांक १८३ मधून काँग्रेसच्या उमेदवार आशा काळे यांनी दिमाखदार विजय मिळवला आहे. या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मुंबईतील हा आजचा पहिला निकाल ठरला आहे.
मुंबई महानगरपालिका निकालाचे सर्व अपडेट्स इथे पहा Live
अटीतटीच्या लढतीत बाजी या प्रभागात काँग्रेस, मनसे आणि भाजप यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळाली. सुरुवातीच्या फेरीपासूनच आशा काळे यांनी आघाडी घेतली होती. त्यांनी मनसेच्या उमेदवार पारूबाई कटके यांचा पराभव करत हा गड राखला आहे. धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि आशा काळे यांच्या विजयाने काँग्रेसने आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. माजी काँग्रेस नगरसेवक दीपक काळे यांच्या आशा काळे या पत्नी आहेत.
मुंबईत काँग्रेसची दमदार सुरुवात एकीकडे भाजप-शिंदेसेना महायुती आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती यांच्यात चुरस असताना, काँग्रेसने पहिला निकाल आपल्या नावे करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईतील इतर प्रभागांमध्येही काँग्रेसचे उमेदवार अनेक ठिकाणी आघाडीवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.