भाजपा नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

By Admin | Updated: March 22, 2015 01:43 IST2015-03-22T01:43:51+5:302015-03-22T01:43:51+5:30

भाजपाचा प्रभाग क्र. ३६ मधील नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य अश्विन कासोदरिया यांनी एका तेरावर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BJP corporator filed for molestation charge | भाजपा नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजपा नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

भार्इंदर : भाजपाचा प्रभाग क्र. ३६ मधील नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य अश्विन कासोदरिया यांनी एका तेरावर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात कासोदरिया यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. मीरा रोड येथील शांतीनगर सेक्टर-६ मध्ये राहणाऱ्या कासोदरिया यांनी शुक्रवारी शाळेतून घरी जात असलेल्या १३ वर्षीय मुलीला जिन्यावर अडविले. तिचा हात पकडून आपण दोघे मित्र असे सांगून तिचा विनयभंग केला. मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांनी मीरा रोड पोलिसांत धाव घेतली. कासोदरियाविरोधात रात्री उशिरा विनयभंग व बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, कासोदरियाला याबाबतची माहिती मिळाल्याने ते परिसरातून पसार झाले. (प्रतिनिधी)

Web Title: BJP corporator filed for molestation charge