बेस्ट चालकाचे अधिका:यांवर वार

By Admin | Updated: September 6, 2014 03:17 IST2014-09-06T03:17:42+5:302014-09-06T03:17:42+5:30

बेस्ट चालकाने रागाच्या भरात आपल्या दोन वरिष्ठ सहका:यांवर कोयत्याचे सपासप वार करून स्वत:चे आयुष्यही संपविण्याचा प्रयत्न केला.

Best Driver's Officer: War on | बेस्ट चालकाचे अधिका:यांवर वार

बेस्ट चालकाचे अधिका:यांवर वार

मुंबई सेंट्रल डेपातील प्रकार : जोडीदाराची डय़ुटी बदलल्याने केला हल्ला, आत्महत्येचाही प्रयत्न 
मुंबई : बेस्ट चालकाने रागाच्या भरात आपल्या दोन वरिष्ठ सहका:यांवर कोयत्याचे सपासप वार करून स्वत:चे आयुष्यही संपविण्याचा प्रयत्न केला. सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबई सेंट्रल बेस्ट डेपोमध्ये हा प्रकार घडला. सोबत असलेल्या कंडक्टरची डय़ुटी अन्य बसवर लावली, हे या हल्ल्याचे निमित्त ठरले.
शंकर आनंदा माने (35) असे या आरोपी चालकाचे नाव आहे. त्याने दिलीप सहदेव डोंगरे (55), रतन विलास शेंडगे (52)या दोघांवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात डोंगरेंच्या खांद्यावर, तर शेंडगेंच्या पाठ, हात आणि पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हे दोघे डेपोत बस स्टार्टर या पदावर कार्यरत आहेत. ड्रायव्हर, कंडक्टरना डय़ुटी लावणो ही त्यांची जबाबदारी आहे. 
माने पहाटे सहाच्या सुमारास डेपोत रुजू झाला. मात्र नेहमीच्या कंडक्टरला दुस:या बसवर डय़ुटी लावल्याचे समजताच संतापलेला माने डोंगरे-शेंडगेंकडे गेला. तेथे त्याने या मुद्दय़ावरून दोघांशी हुज्जत घातली. दोघांशी वाद घालून तो कामावर निघून गेला. मात्र साडेनऊच्या सुमारास तो पुन्हा डेपोत परतला. तेव्हा मात्र त्याने डोंगरे-शेंडगेंवर कोयत्याचे वार केले. अन्य सहका:यांनी त्याला अडवले आणि शांत केले. मात्र क्षणात मानेही खाली कोसळला आणि बेशुद्ध पडला. 
सहका:यांनी डोंगरे-शेंडगेंसह मानेलाही उपचारार्थ नायर रुग्णालयात दाखल केले. नागपाडा पोलिसांनी मानेविरोधात हत्येचा प्रयत्न, आत्महत्येचा प्रयत्न असा गुन्हा नोंदवला. (प्रतिनिधी)
 
च्हल्ल्याआधी माने कीटकनाशक प्यायला होता. मानेला रात्री उशिरार्पयत शुद्ध आली नव्हती. च्मानेची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर नायर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

 

Web Title: Best Driver's Officer: War on