बदलापूरमध्ये सायडिंगची लोकल पेटली

By Admin | Updated: November 26, 2014 02:12 IST2014-11-26T02:12:27+5:302014-11-26T02:12:27+5:30

रेल्वे स्थानकालगत सायडिंगच्या ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकलला मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास आग लागली. काही क्षणांतच ती पसरल्याने लोकलचा संपूर्ण डबा आगीच्या विळख्यात सापडला.

Baddal has a siding local belt | बदलापूरमध्ये सायडिंगची लोकल पेटली

बदलापूरमध्ये सायडिंगची लोकल पेटली

बदलापूर : रेल्वे स्थानकालगत सायडिंगच्या ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकलला मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास आग लागली. काही क्षणांतच ती पसरल्याने लोकलचा संपूर्ण डबा आगीच्या विळख्यात सापडला. आग कशामुळे लागली याचा शोध रेल्वे प्रशासन घेत आहे.महिन्याभरापासून बदलापूर स्थानकाला लागून असलेल्या सायडींग यार्डमध्ये एक लोकल उभी ठेवली होती. तिच्या मधल्या डब्याला दुपारी आग लागली. याची माहिती रेल्वेला मिळतात त्यांनी दोन्हीकडे जाणारी लोकलसेवा थांबविली. तसेच लगेच अगिAशमन बंबांना पाचारण केले. ते येण्या आधीच हा संपूर्ण डबा आगीच्या विळख्यात सापडला होता. बदलापूर अगिAशमन विभागाने लागेच आग विझवली. या घटनेत सुमारे 2क् हजरांचे नुकसान झाल्याचे रेल्वे तर्फे स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Baddal has a siding local belt