वैद्यकीय परीक्षार्थींना ‘कोविड सुरक्षा कवच’, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व परीक्षा मंडळाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 03:47 AM2020-07-15T03:47:52+5:302020-07-15T03:48:27+5:30

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पदवीपूर्व सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी लांबचा प्रवास करू नये, या उद्देशाने त्यांच्या घराजवळच्या महाविद्यालयाचा परीक्षा केंद्र म्हणून पसंतीक्रम द्यावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

Approval of ‘Covid Safety Armor’ for Medical Examiners, University of Health Sciences Management Council and Examination Board | वैद्यकीय परीक्षार्थींना ‘कोविड सुरक्षा कवच’, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व परीक्षा मंडळाची मंजुरी

वैद्यकीय परीक्षार्थींना ‘कोविड सुरक्षा कवच’, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व परीक्षा मंडळाची मंजुरी

Next

मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र या दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे काय, त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न विद्यार्थी संघटनांकडून विचारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना ^‘कोविड सुरक्षा कवच’ योजना लागू करण्याचा निर्णय आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व परीक्षा मंडळाने या योजनेस मंजुरी दिली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पदवीपूर्व सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी लांबचा प्रवास करू नये, या उद्देशाने त्यांच्या घराजवळच्या महाविद्यालयाचा परीक्षा केंद्र म्हणून पसंतीक्रम द्यावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
विद्यार्थांनी पसंतीक्रम त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत विद्यापीठास १४ जुलैपर्यंत पाठवावे, यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. पाठक यांनी सांगितले.

उपचारासाठी मिळणार १ लाख रुपये
या योजनेनुसार विद्यार्थी बाधित झाल्यास उपचारासाठी एक लाख व मृत्यू झाल्यास तीन लाख रुपये देण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व परीक्षा मंडळाने या योजनेस मंजुरी दिल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.

Web Title: Approval of ‘Covid Safety Armor’ for Medical Examiners, University of Health Sciences Management Council and Examination Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.