राज्यातील सात परीविक्षाधीन उपअधीक्षकांच्या नियुक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:06 IST2021-03-05T04:06:33+5:302021-03-05T04:06:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य पोलीस दलात उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त म्हणून निवड झालेल्या सात परीविक्षाधीन अधिकाऱ्यांची विविध ...

Appointment of seven probationary Deputy Superintendents in the State | राज्यातील सात परीविक्षाधीन उपअधीक्षकांच्या नियुक्त्या

राज्यातील सात परीविक्षाधीन उपअधीक्षकांच्या नियुक्त्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य पोलीस दलात उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त म्हणून निवड झालेल्या सात परीविक्षाधीन अधिकाऱ्यांची विविध विभागांत नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. गृहविभागाकडून त्याबाबतचे आदेश बुधवारी काढण्यात आले.

परीविक्षाधीन अधिकाऱ्यांची नावे : (कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण)

अमोल ठाकूर (अहेरी उपविभाग, गडचिरोली), नीलेश पालवे व सचिन थोरबोले (दाेघेही सहायक, नागपूर शहर), प्रमिल गिल्डा (उपविभागीय अधिकारी, गडचिरोली), अश्विनी जगताप (नागपूर शहर), राजश्री पाटील (मंगळवेढा उपविभाग, जिल्हा सोलापूर), सुनील सदाशिव साळुंखे (आर्वी उपविभाग, जिल्हा विर्धा).

दरम्यान, मंगळवेढाचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

...................

Web Title: Appointment of seven probationary Deputy Superintendents in the State