अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं, सोनू निगमनंही देवीसमोर गायलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 06:51 PM2021-10-29T18:51:51+5:302021-10-29T18:54:45+5:30

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतात. दिपावली निमित्त अमृता फडणवीस या एक नवं गाणं घेऊन सर्वांच्या भेटीला आल्या आहेत.

Amrita Fadnavis's new song came, Sonu Nigam also sang in front of the Goddess Laxmi | अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं, सोनू निगमनंही देवीसमोर गायलं

अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं, सोनू निगमनंही देवीसमोर गायलं

googlenewsNext
ठळक मुद्देविशेष म्हणजे या गाण्यात प्रसिद्ध गायक सोनू निगमची झलक पाहायला मिळत आहे. दिपावलीनिमित्त त्या महालक्ष्मीची आरती घेऊन सर्वांच्या भेटीला आल्या आहेत. 

मुंबई - अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी म्हणून परिचयाच्या आहेत. याशिवाय त्या एक बँकर आणि गायिका म्हणूनही परिचित आहेत. अनेकदा त्या आपल्या गाण्यांच्या माध्यमातून सर्वांसमोर येत असतात. आता त्यांनी दिपावलीनिमित्त नवं गाणं गायलं असून ते सोशल मीडियातून प्रसिद्धही करण्यात आलंय. ॐ जय लक्ष्मी माता, असे या गाण्याचे बोल आहेत. 

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतात. दिपावली निमित्त अमृता फडणवीस या एक नवं गाणं घेऊन सर्वांच्या भेटीला आल्या आहेत. आपल्या विविध सोशल मीडिया अकाऊंटद्वारे त्यांनी हे गाणं प्रदर्शित केलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात प्रसिद्ध गायक सोनू निगमची झलक पाहायला मिळत आहे. दिपावलीनिमित्त त्या महालक्ष्मीची आरती घेऊन सर्वांच्या भेटीला आल्या आहेत. 


"महालक्ष्मीजी की आरती, जो कोई नर गाता, उर आनंद समाता, पाप उतर जाता! ॐ जय लक्ष्मी माता !,"  असं ट्वीट करत त्यांनी यापूर्वीच गाण्याबद्दल माहिती दिली होती. महालक्ष्मीच्या आरतीचं हे गाणं अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी स्वरबद्ध केलं असून श्रेयस पुराणिक यांनी हे संगीतबद्ध केलं आहे. अमृता फडणवीस या गायन क्षेत्रात करिअर करत आहेत. गाणं हा त्यांचा आवडता छंद आहे, यापूर्वीही त्यांची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. आपल्या गाण्यांमधून सामाजिक विषयांवरही त्यांनी अनेकदा भाष्य केलं आहे.
 

Web Title: Amrita Fadnavis's new song came, Sonu Nigam also sang in front of the Goddess Laxmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.