अखेर बाप्पा पावला! ई-पासमध्ये गणपतीसाठी प्रवासाचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 03:11 AM2020-08-10T03:11:46+5:302020-08-10T06:54:04+5:30

चाकरमान्यांना ई-पास लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत म्हणून मुंबईतील १२ परिमंडळांतील उपायुक्तांना ई-पास मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत.

Travel for ganesh festival option now available in e pass | अखेर बाप्पा पावला! ई-पासमध्ये गणपतीसाठी प्रवासाचा पर्याय

अखेर बाप्पा पावला! ई-पासमध्ये गणपतीसाठी प्रवासाचा पर्याय

googlenewsNext

मुंबई : गणेशोत्सवासाठी महिनाभर आधीपासूनच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची धडपड सुरू असते. यंदा मात्र बाप्पाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच कोरोनामुळे ई-पासचे विघ्न चाकरमान्यांसमोर उभे ठाकले होते. यावरून राजकीय वातावरणही तापले. अखेर शनिवारपासून ही तांत्रिक अडचण दूर करत ई-पासमध्ये गणपती प्रवासासाठीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

चाकरमान्यांना ई-पास लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत म्हणून मुंबईतील १२ परिमंडळांतील उपायुक्तांना ई-पास मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. अर्जाची योग्य पडताळणी करा, पण विनाकारण विलंब नको, अशा सूचना सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनय कुमार चौबे यांनी दिल्या आहेत. तसेच यात पारदर्शकता हवी, असेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यभरात महाराष्ट्र पोलिसांकड़ून आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ११ हजार ४९९ ई-पास देण्यात आले आहेत.

पूर्वतयारीसाठी हातात उरले अवघे काही दिवस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरई पास मंजूर झाल्यानंतरही गावी गेल्यानंतर गणेशोत्सवापूर्वी कुठे १०, तर कुठे ७ दिवस क्वॉरंटाईन राहणे नियामनुसार बंधनकारक आहे.
क्वॉरंटाईननंतर बाप्पाच्या तयारीसाठी चाकरमान्यांच्या हातात अवघे काही दिवस शिल्लक राहणार आहेत. तरीही ई-पासमध्ये गणपतीसाठी पर्याय उपलब्ध झाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Travel for ganesh festival option now available in e pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.