Ganesh immersion LIVE Ganesh immersion started across the maharashtra | Ganpati Visarjan 2019 LIVE Updates: 'पुढच्या वर्षी लवकर या' राज्यभरातून बाप्पांना निरोप

Ganpati Visarjan 2019 LIVE Updates: 'पुढच्या वर्षी लवकर या' राज्यभरातून बाप्पांना निरोप

Ganesh Visarjan 2019 LIVE  News : वाजत-गाजत गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर आता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज (गुरुवारी) दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून, यासाठी राज्यभरातील महापालिका, नगरपालिका सज्ज झाल्या आहेत. याचबरोबर पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे. 

LIVE

Get Latest Updates

12:14 AM

पोलंडच्या नागरिकांनी कोल्हापुरात पाहिली गणेश विसर्जन मिरवणूक

10:25 PM

नागपूरमध्ये भक्तिभावात गणरायाला निरोप

09:17 PM

सोलापुरातील लाल आखाडा गणपती विसर्जन मिरवणूक

09:07 PM

गणेशगल्लीतील गणेशमूर्तीचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन

मुंबई - 'मुंबईचा राजा' गणेशगल्लीच्या गणेश मूर्तीचे रात्री सव्वा आठच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर विसर्जन 

08:33 PM

जळगावमध्ये विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू

जळगाव : विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू आहे. पावसामुळे फारसा उत्साह नाही. डी.जे.चा वापर नाही. रात्री ८ वाजेपर्यंत सार्वजनिक ४७ आणि खासगी १६ मुर्तीचे सेंट टेरेसा पाॅईटला विसर्जन झाले. सार्वजनिक ६ मंडळाचे विसर्जन झाले. ४६ मंडळे अद्याप बाकी आहेत.

08:15 PM

शिंदखेडा तालुक्यातील गोराने विटाई येथील विसर्जन करताना तरुण पाण्यात बुडाला

धुळे - शिंदखेडा तालुक्यातील गोराने विटाई येथील भागवत पवार वय १८ पांझरा नदीत गणपती विसर्जन करतांना पाण्यात बुडाला,पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे. 

07:52 PM

सोलापुरातील पाणीवेस तालीम गणेशोत्सव मंडळाची दिमाखात निघालेली विसर्जन मिरवणूक

सोलापूर : सोलापुरातील पाणीवेस तालीम गणेशोत्सव मंडळाची दिमाखात निघालेली विसर्जन मिरवणूक

 

07:45 PM

घरगुती गणपती विसर्जनादरम्यान किशोरवयीन मुलाचा मृत्यू

वाशीम -  घरगुती गणेश विसर्जनादरम्यान १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना वाशिम जिल्ह्यातील मंगरूलपीर| तालुक्यात मसोला खुर्द येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.

07:35 PM

मुठा नदीतून एकाच दिवसात सहा व्यक्तींना जीवदान

पुणे - मुठा नदीतून एकाच दिवसात सहा व्यक्तींना जीवदान, विसर्जनासाठी आलेले युवक वाहून जात असताना पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने वाचवले

07:34 PM

नवी मुंबई वाशी येथील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन

नवी मुंबई वाशी येथील सार्वजनिक  गणपतीचे  विसर्जन

07:27 PM

राज्यभरात 'पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात बाप्पांना निरोप

07:19 PM

अर्थररोड पुल धोकादायक असल्याने एका वेळी एकच मूर्ती घेऊन जात होते

मुंबई - अर्थररोड पुल धोकादायक असल्याने एका वेळी एकच मूर्ती घेऊन जात होते

06:48 PM

कोल्हापूरमध्ये अनेक मंडळांनी पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी गणेश मूर्तींचे दान

कोल्हापूर - कोल्हापूरमध्ये अनेक मंडळांनी पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी गणेश मूर्तींचे दान करण्यात आले. संध्याकाळी 6 पर्यंत 26 मंडळांनी मुर्ती दान केल्याअसुन 2 मुर्ती नदीत सोडण्यात आले आहेत

06:42 PM

गणेशगल्लीचा गणपती गिरगाव चौपाटीवर दाखल

मुंबई - गणेशगल्लीचा गणपती गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात होणार विसर्जन

06:40 PM

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन

पुणे - पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन 

06:39 PM

मुंबईत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ३८३ सार्वजनिक आणि ८ हजार ९१८ घरगुती गणपतींचे विसर्जन

मुंबईत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ३८३ सार्वजनिक आणि ८ हजार ९१८ घरगुती गणपतींचे विसर्जन 

06:37 PM

गणपती विसर्जन करताना खदानीतील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

नांदेड : हदगाव तालुक्यातील तामसा येथे गणपती विसर्जन करताना खदानीतील पाण्यात बुडून मुन्ना बास्टेवाड या तरुणाचा मृत्यू

06:15 PM

गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले तीन युवक गोदावरीच्या पात्रात बुडाले, दोघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध सुरू

नाशिक - गणेश विसर्जन करण्यासाठी गंगापूरगाव येथे गेलेल्या युवकांपैकी तीन युवक गोदावरीच्या पात्रात बुडाले. दोघांना बाहेर काढण्यास अग्निशमन व जीवरक्षक दलाच्या जवानांना यश. एका युवकाचा शोध सुरू

05:35 PM

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी विराजमान गणपतीचे विसर्जन

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन, यावेळी आमदार प्रणिती शिंदे व परिवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

05:19 PM

साताऱ्यामध्ये ढोलताशांच्या गजरात बाप्पांना निरोप

05:16 PM

नाशिक गणेश विसर्जन मिरवणूक

05:09 PM

पुण्यातील मानाच्या कसबा आणि तांबडी जोगेश्वरी मंडळांच्या गणपतींचे विसर्जन

पुण्यातील मानाच्या कसबा आणि तांबडी जोगेश्वरी मंडळांच्या गणपतींचे भक्तिभावात विसर्जन 

05:08 PM

पुढच्या वर्षी लवकर या, 'वर्षा' बंगल्यातील बाप्पांचे विसर्जन

01:53 PM

अहमदनगर गणेश विसर्जन मिरवणुकीत संपूर्ण मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत.

मानाच्या श्री विशाल गणपतीच्या  विसर्जन मिरवणूकमध्ये रथावर कॅमेरे लावण्यात आले आहेत. संपूर्ण विसर्जनाची मिरवणूक या कॅमेरामध्ये टिपली जाणार आहे.

01:21 PM

चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

01:06 PM

पुण्यातील मानाच्या ' श्रीं' च्या विसर्जन मिरवणूक सोहळ्यास मोठ्या दिमाखात प्रारंभ

शहरातील मानाच्या गणपतीच्या मिरवणूकीला मंडईच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ झाला. महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, शिवसेना नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची आरती करून मिरवणुकीचा ' 'श्रीगणेशा' करण्यात आला. 

12:58 PM

नाशिक : रिमझिम पावसात नाशिकमध्ये मुख्य विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात.

नाशिक : रिमझिम पावसात नाशिकमध्ये मुख्य विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात.

12:32 PM

अकोला : गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ. पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

12:17 PM

विसर्जनासाठी गेलेला युवक कोयना नदीपात्रात वाहून गेला

विसर्जनासाठी गेलेला युवक कोयना नदीपात्रात वाहून गेला

 

11:28 AM

तपोवन गोदावरी नदीच्या पात्रात गणेश मूर्ती विसर्जनासाठी भाविकांची गर्दी

नाशिक : गणेश अनंत चतुर्दशी निमित्ताने तपोवन गोदावरी नदीच्या पात्रात गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारले आहे तसेच कृत्रिम तलाव निर्मिती केली आहे.

11:17 AM

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक लाईव्ह पाहा

11:02 AM

मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

10:59 AM

मोरया मित्र मंडळ खेडी सकाळी दहा वाजता विसर्जन झाले आहे

10:58 AM

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूकीला रिमझीम पावसात सुरुवात

Web Title: Ganesh immersion LIVE Ganesh immersion started across the maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.