Ganesh festival will be a health festival amid corona crisis | गणेशोत्सव होणार आरोग्योत्सव!; सार्वजनिक मंडळांचा संकल्प

गणेशोत्सव होणार आरोग्योत्सव!; सार्वजनिक मंडळांचा संकल्प

मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव आरोग्यदायी करण्यासाठी कंबर कसली आहे. पुणे-मुंबईसह सर्वत्र भव्य-दिव्य गणेशमूर्तींऐवजी लहान ४ फूट मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. आगमन आणि विसर्जनाच्या भव्य मिरवणुका न काढता अत्यंत साधेपणाने सोहळा साजरा होईल. बहुतांश मंडळांनी आरोग्यविषयक जनजागृतीवर भर दिला आहे.

पुणे : ५० मंडळे रस्त्यावर मंडप उभारणार नाहीत, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई गणपती यंदा मंदिरातच प्रतिष्ठापना करणार आहेत. महापालिकेनेही घरीच मूर्ती बसवून घरीच विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.

नाशिक : कोणत्याही मंडळाकडून ‘व्हीआयपी आरती’ केली जाणार नाही.

औरंगाबाद : मोठ्या मंडळांनी जेथे मूर्ती आहेत तेथेच पूजाअर्चा करण्याचा संकल्प सोडला आहे.

सोलापूर : ‘लोकमत’च्या माध्यमातून ‘घरोघरी शाडूची मूर्ती’ ही चळवळ राबविली जात आहे.

कोल्हापूर : ३०० गावांनी ‘एक गाव - एक गणपती’ राबविण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : बहुतांश मंडळांनी अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा संकल्प के ला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ganesh festival will be a health festival amid corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.