Maharashtra Election 2019: Ritesh- Genelia duo 'Lay Bhari'; The right to vote in the rain | रितेश- जेनेलियाची जोडी 'लय भारी'; भर पावसात येऊन बजावला मतदानाचा हक्क
रितेश- जेनेलियाची जोडी 'लय भारी'; भर पावसात येऊन बजावला मतदानाचा हक्क

लातूर : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या जोडीने आज सकाळी भर पावसात लातूर ग्रामीण मतदार संघातील बाभळगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सोबत वैशाली देशमुख यासुद्धा होत्या. 

यानंतर संपूर्ण देशमुख परिवार मतदार केंद्रावर दाखल झाला. माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख, वैशाली विलासराव देशमुख, लातुर शहर विधानसभेचे उमेदवार माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख, अदिती देशमुख, सिनेअभिनेते रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, लातुर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख, दिपशिखा देशमुख यांनी एकत्रित येत सकाळी मतदानाचा हक्क बजावला.

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे लातूर शहर मतदार संघातून तर लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख निवडणूक लढवत आहे. याआधी विलासराव आणि त्यांचे बंधु दिलीपराव देशमुख सोबतच आमदार होते. त्यामुळे या दोघांनाही आमदार होऊन देशमुख कुटुंबातील दोन भाऊ आमदार असण्याची परंपरा कायम राखण्याची संधी मिळाली आहे. अर्थात, यासाठी मतदारांच्या पसंतीवर सर्वकाही अवलंबून असणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Ritesh- Genelia duo 'Lay Bhari'; The right to vote in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.