गणेश विसर्जनावेळी लातुरात या मार्गांवर फक्त मिरवणुक; पर्यायी वाहतुक व्यवस्था जाणून घ्या
By हणमंत गायकवाड | Updated: September 7, 2022 17:52 IST2022-09-07T17:51:03+5:302022-09-07T17:52:06+5:30
मिरवणुकीसाठी काही मार्ग राखीव, पर्यायी मार्गांवरून वाहतुकीची सोय करण्यात आली आहे

गणेश विसर्जनावेळी लातुरात या मार्गांवर फक्त मिरवणुक; पर्यायी वाहतुक व्यवस्था जाणून घ्या
लातूर : गणेश विसर्जन मिरवणुका सुलभ होण्यासाठी लातूर शहरातील दैनंदिन वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. सोयीच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ९ सप्टेंबर रोजी दैनंदिन वाहतूक मार्ग बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. सकाळी १० ते रात्री २३.५० वाजेपर्यंत पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी असेल.
वाहतुकीचे पर्यायी मार्ग...
- पीव्हीआर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक व शहरात येणाऱ्या एसटी बसेस पीव्हीआर चौकातून रिंग रोडने नवीन रेणापूर नाका मार्ग, जुना रेणापूर नाका येथील बसस्टँडचा वापर करतील. उर्वरित सर्व वाहने जुन्या रेल्वे लाईनच्या पॅरलर रोडचा वापर करतील.
- औसा रोडने शहरात येणाऱ्या एसटी बसेस राजीव गांधी चौक मार्गेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी डेपोचा वापर करतील. तसेच चारचाकी, तीनचाकी व दोन चाकी वाहने जुना औसा रोड, एलआयसी कॉलनी, नाईक चौक सूतमिल रोड या मार्गांचा वापर करतील.
- रेणापूर रोडने शहरात येणाऱ्या एसटी बसेस जुना रेणापूर नाका येथील बसस्थानकाचाच वापर करतील. या रोडने येणारी चारचाकी, तीनचाकी व दोनचाकी वाहने ही जुन्या रेणापूर नाका बालाजी मंदिर व खोरी गल्ली मार्गाचा वापर करतील.
- नांदेड रोडने शहरात येणाऱ्या एसटी बसेस गरुड चौक, श्री सिद्धेश्वर चौक, नवीन रेणापूर नाका मार्गे, जुना रेणापूर नाका येथील बसस्थानकाचा वापर करतील.
या मार्गांवर फक्त मिरवणुका, वाहतुकीस बंद
गंजगोलाई, सुभाष चौक, दयाराम रोड मार्ग, खडक हनुमान-श्री सिद्धेश्वर मंदिर या मिरवणूक मार्गांवर सर्व वाहनास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.