इचलकरंजीत महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 11:40 IST2021-03-22T11:38:34+5:302021-03-22T11:40:25+5:30
mahavitaran Ichlkarnaji Kolhapur- इचलकरंजी येथील आवळे गल्ली परिसरामध्ये वीज पुरवठ्याची वसुली करायला गेलेल्या कर्मचाऱ्यास पाच ते सहा अनोळखी व्यक्तींंनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. युवराज रावसाहेब माळी (वय 26, रा.चिपरी) असे महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.

इचलकरंजीत महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण
इचलकरंजी : येथील आवळे गल्ली परिसरामध्ये वीज पुरवठ्याची वसुली करायला गेलेल्या कर्मचाऱ्यास पाच ते सहा अनोळखी व्यक्तींंनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. युवराज रावसाहेब माळी (वय 26, रा.चिपरी) असे महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी युवराज माळी हे नेहमीप्रमाणे महावितरणची थकीत विज बिल असणाऱ्या ग्राहकांची वसुली करण्यासाठी दिलेल्या भागात गेले होते.
आवळे गल्ली परिसरात युवराज हे वसुलीसाठी गेले असता तेथे त्यांना 5 ते 6 अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांना तातडीने आय.जी.एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, ही बातमी समजताच महावितरणचे कर्मचाऱ्यांनी गावभाग पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.