Literal dispute between legislator and factory builder | आमदार सुरेश हाळवणकर व यंत्रमागधारक कारखानदार यांच्यात शाब्दिक वाद

आमदार सुरेश हाळवणकर व यंत्रमागधारक कारखानदार यांच्यात शाब्दिक वाद

ठळक मुद्देकिल्ल्या देण्याचे आंदोलन, फसवी घोषणा नको ; पूर्ववत अनुदान द्या २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांची मागणी

इचलकरंजी : यंत्रमागधारक व आमदार सुरेश हाळवणकर यांच्यात २७ अश्वशक्तीवरील वीजदर अनुदानाबाबत इचलकरंजी प्रांत कार्यालयात संयुक्त बैठक आयोजित केली. या बैठकीत शाब्दिक वादविवाद झाला. त्यामुळे चर्चा फिस्कटली. अखेर यंत्रमागधारक कारखान्याच्या चाव्या प्रांताधिकाऱ्यांच्या टेबलवर टाकून निघून गेले.

२७ अश्वशक्तीवरील वीजदरात तीन रुपये ४० पैसे अनुदान शासनाने लागू केले आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दोन दिवसांपूर्वी दिली होती. मात्र, हिशोब पाहिला तर ही घोषणा फसवी असल्याचा आरोप एअरजेट लूम ओनर्स असोसिएशनने केला. त्या संदर्भात हाळवणकर यांच्या घरी जावून कारखान्याच्या किल्ल्या देण्याचे आंदोलन यंत्रमागधारक करणार होते.

दरम्यान, ही माहिती समजताच पोलिसांनी मागण्यासाठी कार्यालयात जा पण घरी नको, असे म्हणून प्रांत कार्यालयात संयुक्त बैठक आयोजित केली. या बैठकीत वीज दरातील अनुदानावरून यंत्रमागधारक व आमदार हाळवणकर यांच्यात शाब्दिक वादविवाद झाला. त्यामुळे चर्चा फिस्कटली. अखेर यंत्रमागधारक कारखान्याच्या चाव्या प्रांताधिकाऱ्यांच्या टेबलवर टाकून निघून गेले.

या प्रकरणात पोलिस दलाने अरेरावीची भाषा वापरून दमदाटी केल्याचा आरोप करत असोसिएशनने त्यांचा निषेध व्यक्त केला. याविरोधात प्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही यंत्रमागधारकांनी दिला.

Web Title: Literal dispute between legislator and factory builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.