KDMC महासभा कधी घेणार? अद्याप प्रशासकीय राजवट का? भाजप नगरसेवकाने घेतली महापौर, सचिवांची भेट

By मुरलीधर भवार | Updated: February 24, 2026 20:23 IST2026-02-24T20:23:35+5:302026-02-24T20:23:35+5:30

महापालिकेच्या निवडणूकीत १२२ नगरसेवक निवडून आले.

when will kdmc hold general assembly why is it still administrative rule BJP corporator meets mayor secretary | KDMC महासभा कधी घेणार? अद्याप प्रशासकीय राजवट का? भाजप नगरसेवकाने घेतली महापौर, सचिवांची भेट

KDMC महासभा कधी घेणार? अद्याप प्रशासकीय राजवट का? भाजप नगरसेवकाने घेतली महापौर, सचिवांची भेट

मुरलीधर भवार, कल्याण : राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक पार पडली. अन्य महापालिकेत महासभा संपन्न झाल्या. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेत महासभा घेतली जात नाही. निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आले तरी अजूनही महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे का ? असा सवाल भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यानी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी आज महापौर हर्षाली थविल चौधरी आणि सचिव किशोर शेळके यांची भेट घेतली.

महापालिकेच्या निवडणूक न झाल्याने पाच वर्षे प्रशासकीय कारभार होता. महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली. निवडणूकीचा निकाल १६ जानेवारी रोजी पार पडला. त्यानंतर ३ फेब्रुवारी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली.महापालिकेचा अर्थ संकल्प तयार करण्यासाठी कर दर निश्चीतीसाठी महासभा घ्यावी लागते. ही महासभा २० फेब्रुवारीच्या आत घेणे महापालिका अधिनियमानुसार बंधनकारक आहे. या नियमानुसार अद्याप सभा लावलेली नाही. २० फेब्रवारी ही तारीख उलटून गेली आहे. नव्याने निवडून आलेले नगरसेवकांची महासभा लावली जात नसेल तर अद्याप महापालिकेत प्रशासकीय राजवट असून सगळा कारभार प्रशासकाच्या हाती आहे ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे महासभा तातडीने लावण्यात यावी अशी मागणी म्हात्रे यांनी केल्यावर महापौर आणि सचिवांना महासभा लवकर लावली जाईल असे आश्वस्त केले आहे.

महापालिकेच्या निवडणूकीत १२२ नगरसेवक निवडून आले. भाजपने ५०, शिंदे सेनेने ५३, मनसनेने ५, उद्धव सेनेने ८ , का’ग्रेसने २ आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने १ सदस्य संख्येचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिला आहे. मात्र उद्धव सेनेचे नगरसेवक मधूर म्हात्रे, स्वप्नाली केणे, राहूल कोट हे तिघांनी नगरसेवक पदाची नोंदणी केली आहे. पण त्यांचा स्वतंत्र गट स्थापन केलेला नाही. त्यामुळे महासभा बोलविण्यात आलेली नाही असे सांगण्यात येत आहे.

Web Title : केडीएमसी महासभा में देरी: भाजपा पार्षद ने प्रशासनिक शासन पर सवाल उठाए

Web Summary : भाजपा पार्षद ने चुनावों के बावजूद केडीएमसी महासभा बुलाने में देरी पर सवाल उठाया। उन्होंने महापौर और सचिव से मुलाकात की, लंबित नगरपालिका मामलों को संबोधित करने और कथित प्रशासनिक शासन को समाप्त करने के लिए तत्काल सभा का आग्रह किया, क्योंकि सभा की समय सीमा समाप्त हो गई है।

Web Title : KDMC General Assembly Delay: BJP Corporator Questions Administrative Rule

Web Summary : A BJP corporator questioned the delay in convening the KDMC General Assembly despite elections. He met with the mayor and secretary, urging for an immediate assembly to address pending municipal matters and end the perceived administrative rule, as the deadline for the assembly has passed.