ठाकुर्लीत लोकलच्या पेंटाग्राफ समस्येमुळे मध्य रेल्वे विस्कळीत
By अनिकेत घमंडी | Updated: April 4, 2024 17:22 IST2024-04-04T17:18:38+5:302024-04-04T17:22:05+5:30
ठाकुर्ली व कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली.

ठाकुर्लीत लोकलच्या पेंटाग्राफ समस्येमुळे मध्य रेल्वे विस्कळीत
अनिकेत घमंडी,डोंबिवली:ठाकुर्ली व कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान गुरुवारी दुपारी १२.४६ वाजता बदलापूर येथे जाणारी लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली. लोकल बंद पडल्यामुळे मुळे प्रवासी हैराण झाले होते. भर दुपारी उन्हात रेल्वे रुळातून ठाकुर्ली स्थानक गाठावे लागले.
रेल्वे प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दुरुस्ती करणारी यंत्रणा जाऊन त्यांनी काम केले. त्यामुळे पाऊण तासाने लोकल इंजिनाच्या सहाय्याने पुढे नेण्यात आली त्यानंतर ओव्हरहेड वायरचे काम करण्यात आले आणि लोकल वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र तोपर्यंत वेळापत्रक कोलमडले होते. संध्याकाळी ५ नंतर सर्व सेवा सुरळीत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.