दगडी दरवाज्याचा बुरुज पाडणाऱ्या जेसीबीवर अमळनेर येथे दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 23:26 IST2020-10-25T23:16:16+5:302020-10-25T23:26:10+5:30
अमळनेरमध्ये जेसीबीवर दगडफेक केली.

दगडी दरवाज्याचा बुरुज पाडणाऱ्या जेसीबीवर अमळनेर येथे दगडफेक
अमळनेर (जि.जळगाव ) : अमळनेर येथील दगडी दरवाज्याचा बुरुज पाडणाऱ्या जेसीबीवर आठ ते १० तरुणांनी दगडफेक केली. यात जेसीबीचा काच फुटला आहे. पोलिसांची गाडी येताच तरुणांनी पळ काढला. ही घटना रविवारी रात्री १०.१५ वाजता घडली.
ऐतिहासिक दगडी दरवाजा दुरुस्तीसाठी नगरपरिषदेच्या ताब्यात गेल्यानंतर नगरपरिषदेने कालपासून त्याचे बुरुज पाडणे सुरू केले होते. आज रविवारी रोजी सर्व काम आटोपल्यानन्तर जेसीबी मशीन दगडी दरवाज्याजवळ उभे असताना आठ ते १० जणांचा जमाव आला आणि अनक दगडफेक सुरू केली. तेवढयात तेथील नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस नाईक शरद पाटील तेथे पोहचल्याने तरुणांनी पळ काढला घटनेबद्दल नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पोलिसांनी रात्रीच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे.
घटनास्थळी माजी आमदार साहेबराव पाटील, पंकज चौधरी, चेतन शहा पोहचले. नागरिकांनी आग्रह केल्याने रात्रीच पुन्हा बुरुज पाडण्याचे काम सुरू झाले.