Maharashtra Election 2019: 'Want Road to the village ...'; Karwadi villagers boycott voting for road demands | Maharashtra Election 2019 : 'गावाला रस्ता हवा...'; रस्त्याच्या मागणीसाठी करवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
Maharashtra Election 2019 : 'गावाला रस्ता हवा...'; रस्त्याच्या मागणीसाठी करवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

कळमनुरी : तालुक्यातील करवाडी येथील ग्रामस्थांनी करवाडी ते नांदापूर रस्त्याच्या मागणीसाठी विधानसभेच्या मतदानावरही बहिष्कार टाकला आहे.

करवाडी ते नांदापूर पर्यंतचा रस्ता व्हावा,यासाठी येथील ग्रामस्थांनी विविध आंदोलने केली. रस्ता नसल्याने पावसाळ्यात या गावचा संपर्क तुटतो येथे १५० ते १७५ मतदार आहेत. येथील ग्रामस्थांनी मागील लोकसभा, जि.प. व पं.स.च्या निवडणूकीच्या मतदानावरही बहिष्कार टाकला होता. यापूर्वीच ग्रामस्थांच्यावतीने प्रशासनाला निवेदन देवून रस्ता होईपर्यंत मतदानावर बहिष्कार राहणार असल्याचे निवेदन प्रशासनाला दिले होते. रस्ता न झाल्याने ग्रामस्थांनी मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला. 

या गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गरोदर महिला व वृद्धांना पावसाळ्यात बाजेवर नेण्याची वेळ आली होती. कोणीही अधिकारी आमच्या गावाकडे दुपारपर्यंत आला नसल्याचे रामा पोटे यांनी सांगितले. रस्ता होईपर्यंत मतदानावरील बहिष्कार कायमच राहणार असल्याचे उत्तम कºहाळे लक्ष्मण पोटे, शिवाजी कºहाळे, रामराव कºहाळे, संतोष बेले, मिनाबाई काळे, सरस्वती कºहाळे आदींनी सांगितले.

Web Title: Maharashtra Election 2019: 'Want Road to the village ...'; Karwadi villagers boycott voting for road demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.