EVMs fail at four polling booths in Hingoli district | हिंगोली जिल्ह्यात चार मतदान केंद्रावर 'ईव्हीएम'मध्ये बिघाड
हिंगोली जिल्ह्यात चार मतदान केंद्रावर 'ईव्हीएम'मध्ये बिघाड

हिंगोली : जिल्ह्यातील तीन मतदार संघातील चार केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड झाला आहे. जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्रात एकूण १ हजार १ मतदान केंद्र आहेत. यातील वसमतकळमनुरी येथील एक आणि सेनगाव येथील दोन मतदान केंद्रावर ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट बिघाड आढळून आला. यामुळे या केंद्रांवरील मतदान प्रक्रिया जवळपास एक ते दोन तास बंद होती. 

वसमत विधानसभा क्षेत्रातील परळी दशरे येथील मशिनमध्ये बिघाड झाल्याने दीड तास मतदान बंद होते. त्यानंतर मशिन बदलल्यानंतर मतदार प्रक्रिया सुरळीत झाली. कळमनुरी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मशिन ९.३० वाजता अचानक बंद पडली. अर्ध्या तासानंतर मशिन बदलण्यात आल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. 

हिंगोली विधानसभा क्षेत्रातील सेनगाव तालुक्यातील सापडगाव येील इव्हीएम मशिन सकाळपासून तब्बल दोन तास बंद होती. तसेच सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येील बु क्र. ११३ मधील ईव्हीएम सकाळी ९ वाजता अचानक बंद पडली ९ वाजता मशिन बदलण्यात आली. जवळपास एक तास मतदान बंद होते. या केंद्रांवरील मशिनमध्ये बिघाड झाल्याने अनेक मतदार मतदान न करताच परतल्याचे चित्र दिसून आले.


Web Title: EVMs fail at four polling booths in Hingoli district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.