Maharashtra Election 2019 : People love BJP for development works | Maharashtra Election 2019 : विकास कामांमुळे जनतेचे भाजपवर प्रेम
Maharashtra Election 2019 : विकास कामांमुळे जनतेचे भाजपवर प्रेम

ठळक मुद्देराजकुमार बडोले : गोरेगाव तालुक्यात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : मागील पाच वर्षांत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने जी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.त्यामुळे भाजपप्रती जनतेचा विश्वास आणि प्रेम वाढत चालले आहे. जनतेच्या प्रेम आणि विश्वासाची परतफेड आपण नक्कीच विकास कामांच्या माध्यमातून करु असे प्रतिपादन अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी केले.
तालुक्यातील मोहगाव तिल्ली येथे सोमवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, लक्ष्मण भगत, सिता रंहागडाले, विश्विजत डोंगरे, दिलीप चौधरी, किशोर गौतम, झुम्मकभाऊ बिसेन, खोमेंद्र मेंढे, अशोक लंजे, नितीन कटरे, सुरेंद्र धमगाये यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मोहगाव येथे राजकुमार बडोले यांचे आगमन होताच पदाधिकारी,कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात जोरदार स्वागत केले. गावातील महिलांनी त्यांची ओवाळणी व औक्षवन करुन स्वागत केले.
बडोले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत आपल्यावरील प्रेम यापुढेही असे कायम राहू अशी भावनिक साद घातली.मागील निवडणुकीत काळात सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून दीन दुबळया, शोषित, वंचित, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, निराधार लोकांना न्याय देण्याचे कार्य केले. मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री पेयजल योजना, दिव्यांगाना साहित्य वाटप, कामगार बांधवांना किट वाटप तसेच पाल्यांना व कुटुंबांना शैक्षणिक व आर्थिक लाभ अशा अनेक योजनांचा माध्यमातून सामान्य माणसांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. राज्यात पुन्हा भाजप-सेना महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत. या क्षेत्राचा कायापालट करण्याचे विकासाचे व्हिजन हे केवळ भाजपकडेच असून यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्य व आशिर्वादाची गरज असल्याचे ते म्हणाले. या वेळी निंबा येथील राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रचारसभेनंतर त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून बडोले यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या पदयात्रेत मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मतदारांच्या प्रेम आणि आदरतिथ्याने बडोलेही भारावले
गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथे सोमवारी राजकुमार बडोले यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.या वेळी गावकऱ्यांनी फुलांची उधळण करुन तर महिलांनी त्यांची औक्षवन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मतदारांकडून झालेल्या आदरतिथ्याने बडोले सुध्दा भारावले होते.

Web Title: Maharashtra Election 2019 : People love BJP for development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.