पाच लाख कार्डधारक रेशनवर जगतात, तरीही दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले, हे कसे?
By किशोर कुबल | Updated: February 2, 2024 15:10 IST2024-02-02T15:09:37+5:302024-02-02T15:10:01+5:30
सरदेसाईंचा सवाल, राज्यपालांच्या अभिभाषणावर जोरदार टीका

पाच लाख कार्डधारक रेशनवर जगतात, तरीही दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले, हे कसे?
किशोर कुबल, पणजी: विरोधी आमदार गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर टीका करताना खाणी तसेच म्हादईबद्दल कोणताही उल्लेख नसल्याने नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी लिहून दिलेले भाषणच राज्यपालांनी वाचले. गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या अभिभाषणात काहीच फरक नाही. म्हादईचा धगधगता विषय असताना शब्दही काढला नाही. म्हादई प्रवाह स्थापन केला. परंतु अजून एकही बैठक झालेली नाही. सरकारला या गोष्टीचे सोयर सूतकही नाही. खाण व्यवसाय कधी सुरू होणार हे स्पष्ट केलेले नाही. पाच लाख लोक रेशनवर जगत आहेत. तरीही दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढल्याचा दावा केला जात आहे, हे कसे?. राज्यपालांनी अभिभाषणात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, जी व्टेंटी, पर्पल फेस्ट हे इव्हेंट्सच सांगितले. प्रत्यक्ष जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना स्पर्शही केला नाही, अशी टीका सरदेसाई यांनी केली.