Maharashtra Election 2019 : दारुमुक्त निवडणुकीसाठी गावे एकवटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 AM2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:50+5:30

निवडणूक काळात दारूचा वापर करणार नाही व होऊ देणार नसल्याचा निर्धार या गावांनी केला आहे. विधानसभा निवडणूक संपूर्ण दारूमुक्त व्हावी, यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मतदानाचा अमूल्य हक्क शुद्धीत राहून बजावणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक गावांतील मुक्तिपथ संघटनांनी दारूबंदी टिकवून ठेवली आहे. पण मतदान प्रचारादरम्यान गावात दारूचा शिरकाव होऊ शकतो.

Maharashtra Election 2019 : Villages unite for alcohol free elections | Maharashtra Election 2019 : दारुमुक्त निवडणुकीसाठी गावे एकवटली

Maharashtra Election 2019 : दारुमुक्त निवडणुकीसाठी गावे एकवटली

Next
ठळक मुद्देमद्यपी उमेदवार नको : एटापल्ली तालुक्यातील ४७ गावांनी घेतला ठराव

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी आदिवासीबहुल एटापल्ली तालुक्यातील अनेक गावे एकवटली आहे. आतापर्यंत तब्बल ४७ गावांनी ग्रामसभेत व गावसभेच्या बैठकीत विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्याचा ठराव घेतला आहे. गावागावात रॅली काढून जनजागृती केली जात आहे.
निवडणूक काळात दारूचा वापर करणार नाही व होऊ देणार नसल्याचा निर्धार या गावांनी केला आहे. विधानसभा निवडणूक संपूर्ण दारूमुक्त व्हावी, यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मतदानाचा अमूल्य हक्क शुद्धीत राहून बजावणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक गावांतील मुक्तिपथ संघटनांनी दारूबंदी टिकवून ठेवली आहे. पण मतदान प्रचारादरम्यान गावात दारूचा शिरकाव होऊ शकतो. दारूचे आमिष दाखवून मतदारांचे अमूल्य मत विकत घेण्याचा प्रकारही घडू शकतो. असे होऊन गावातील दारूबंदी फोल ठरू नये म्हणून आतापर्यंत तालुक्यातील ४७ गावांनी दारूमुक्त निवडणुकीचा ििनवडणूक दारुमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिला रॅली काढून जनजागृती करीत आहेत. तोडसा, आलेंगा, जीवनगट्टा, चंदनवेली यासह इतरही दुर्गम गावांमध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
‘जो पाजेल माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ अशा घोषणांनी गावे दणाणली आहेत. जर व्हायचे असेल आमदार तर दारूबंदीला पाठिंबा द्यावाच लागेल, ज्याला दारूबंदी नको तो आमदार आम्हाला नको, दोन पैशाची दारू घेऊन आपले अमूल्य मत वाया घालवू नका, मतदान जरूर करा पण शुद्धीत करा, असा संदेश रॅलीतून दिले जात आहेत.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावात दारू वाटप होऊ देणार नाही तसेच मतदान दारूच्या नशेत करणार नाही, असे ठराव सभेत पारित केले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील तोडसा, पेठा, कारमपल्ली, आलेंगा, डोड्डी एकरा, झारेवाडा, गेदा, चंदनवेली, तांबडा, एकनसूर, ताडपल्ली, बारसेवडा, लांझी, गुरुपल्ली, जावेळी, डुम्मे, पंदेवाही, करेम, तुमरगुंडा, उडेरा, आलदंडी, परसलगोंदी, पुरसलगोंदी, सुरजागड, मंगेर, हेडरी, येमली, बिड्री, फुंडी, हालेवारा, घोटसूर, मुसरमगुडा, पेदुलवाही, जारावंडी, कांदळी, सेवारी, चोखेवाडा, जांभिया आदी गावांनी निवडणूक दारुमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. गावात प्रचारादरम्यान येणाºया दारुवर लक्ष ठेवून असल्याचेही गावकऱ्यांनी संगितले.

महिलांकडून दारूबंदीबाबत जनजागृती
निवडणूक दारुमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिला रॅली काढून जनजागृती करीत आहेत. तोडसा, आलेंगा, जीवनगट्टा, चंदनवेली यासह इतरही दुर्गम गावांमध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली. ‘जो पाजेल माज्या नवºयाला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ अशा घोषणांनी गावे दणाणली आहेत. जर व्हायचे असेल आमदार तर दारूबंदीला पाठिंबा द्यावाच लागेल, ज्याला दारूबंदी नको तो आमदार आम्हाला नको, दोन पैशाची दारू घेऊन आपले अमूल्य मत वाया घालवू नका, मतदान जरूर करा पण शुद्धीत करा, असा संदेश रॅलीरून दिला जात आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : Villages unite for alcohol free elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.