Maharashtra Election 2019 ; BJP's victory over Armorer | Maharashtra Election 2019 ; आरमोरीत भाजपतर्फे विजयी जल्लोष
Maharashtra Election 2019 ; आरमोरीत भाजपतर्फे विजयी जल्लोष

ठळक मुद्देशहरात मिरवणूक : गुलाल उधळून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार कृष्णा गजबे यांनी दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी आरमोरी शहरात मिरवणूक काढून विजयाचा जल्लोष साजरा केला.
आरमोरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी देसाईगंज येथील तहसील कार्यालयात पार पडली. भाजपचे उमेदवार कृष्णा गजबे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना निकालाचे संकेत सकाळपासूनच मिळाले होते. दरम्यान दुपारी आरमोरी येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
कृष्णा गजबे हे विजयी झाल्याने सायंकाळी आरमोरी येथील वडसा टी-पार्इंटवरून भाजपच्या वतीने जल्लोषात विजयी रॅली काढण्यात आली. सदर विजय रॅलीमध्ये सजविलेल्या वाहनावर सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, विजयी उमेदवार कृष्णा गजबे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी हे जनतेला अभिवादन करीत होते. यावेळी आरमोरी व वडसाचे नगराध्यक्ष हजर होते. विजयी रॅलीचा समारोप पोरेड्डीवार निवासस्थानी झाला.

Web Title: Maharashtra Election 2019 ; BJP's victory over Armorer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.