Initiatives for 9 congregations of alcoholic and alcohol-free Ganeshotsav | ३१३ मंडळांचा दारू व खर्रामुक्त गणेशोत्सवासाठी पुढाकार
३१३ मंडळांचा दारू व खर्रामुक्त गणेशोत्सवासाठी पुढाकार

ठळक मुद्देगावोगावच्या मंडपातून जनजागृती : घरातल्या ‘बाल गणेशा’ला खºर्यापासून वाचवण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सध्या सर्वत्र सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या उत्साहात गडचिरोली जिल्ह्यातीग अनेक मंडळांनी धार्मिक भाव जपण्यासोबत व्यसनमुक्तीसाठी जनजागृती सुरू केली आहे. दारू व खºर्यासारखे अपवित्र व्यसन करणाऱ्यांनी गणपतीपासून दूर राहण्याचा सल्ला देत या व्यसनांपासून आपल्या घरातील बाल गणेशाला, अर्थात घरातल्या बालकाला दूर ठेवण्याचे आवाहनही फलकांच्या माध्यमातून केले जात आहे. जिल्हाभरात ३१३ पेक्षा अधिक मंडळांनी अशा जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे.
दारू व तंबाखूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून हे दोन्ही पदार्थ हद्दपार करण्यासाठी मुक्तिपथद्वारे २०१६ पासून प्रयत्न केले जात आहेत. विविध माध्यमातून त्यासाठी जनजागृती केली जात आहे. गणेशोत्सवात सर्वत्र जल्लोष असतो. अशा जल्लोषातही काही जण दारू पिऊन इतरांच्या आनंदावर विरजण घालतात. गणेश मंडपांमध्ये येऊनच खर्रा खात बसतात. हा प्रकार टाळण्यासाठी मुक्तिपथद्वारे दारू व तंबाखूमुक्त गणेशोत्सव हा उपक्र म हाती घेण्यात आला.
दारू व तंबाखूमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुक्तिपथ चमूद्वारे जिल्ह्यातील गणेश मंडळांना करण्यात आले. गणेश मंडळांमध्ये कुणीही दारू व खर्रा खाऊन येऊ नये यासाठी मंडपांमध्ये ‘माझ्या दारात दारू नको, खर्रा नको’, ‘ज्या तोंडाने गणपतीचे नाव घ्यावे त्याच तोंडात दारू व खर्रा टाकाल का?’ असे संदेश असलेले फलक लावण्यात आले.
लहान मुले खर्रा या विषारी पदार्थांच्या आहारी जात आहेत. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी ‘घरातल्या बालगणेशाला खºर्यापासून वाचवा’, अशी भावनिक हाकही देण्यात आली. परिणामी जिल्ह्यातील शंभरावर गावांतील ३१३ गणेश मंडळांनी दारू व खर्रामुक्त गणेशोत्सव साजरा केला.
खर्रा तोंडात असेल तर दर्शनासाठी यायचेच नाही अशी भूमिका मंडळांनी घेतली. अनेक गावांनी गावसभेमध्ये दारू व खर्रामुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा ठरावही घेतला होता. याला चांगला प्रतिसाद मिळालात्र

गणेश मंडपांत दारू-खºर्याला बंदी
मुक्तिपथ गाव व शहर संघटनांच्या पुढाकाराने गडचिरोली तालुक्यातील ४१, अहेरी १३, आरमोरी २२, चामोर्शी ४०, देसाईगंज ६०, धानोरा २१, एटापल्ली १०, कोरची १७, कुरखेडा ४०, मुलचेरा ७, सिरोंचा ३२ आणि भामरागड तालुक्यातील ११ अशा जिल्हाभरातील तब्बल ३१३ गणेश मंडळांनी दारू व तंबाखूमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती केली. मंडळामध्ये नशायुक्त पदार्थ चालणार नसल्याच्या सूचनाच आयोजकांनी केल्या. त्यामुळे गावागावांमध्ये दारू व तंबाखूमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे.

विसर्जन मिरवणुकाही निघणार दारूमुक्त
गणेश मूर्तीचे विसर्जन करताना मोठी मिरवणूक काढली जाते. ढोल-ताशाच्या निनादात, गुलाल उधळत निघणाºया या मिरवणुकांमध्येही दारू पिऊन या सणाच्या पावित्र्याला गालबोट लावण्याचा प्रकार काही जण करतात. असा प्रकार घडू नये यासाठी गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. मिरवणुकीत दारू पिऊन कुणी आल्यास त्याला घरचा रस्ता दाखविला जाईल, अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतली आहे.

Web Title:  Initiatives for 9 congregations of alcoholic and alcohol-free Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.