Gadchiroli Election Results 2019; Dr. Chanda Kodvate Vs Dr. Deorao Holi, Krushna Gajbe Vs Anandrao Gedam, Deepak Atram Vs Ambrishrao Atram, Dharmraobaba Atram | गडचिरोली निवडणूक निकाल; डॉ. होळी आणि गजबे यांची सरशी तर आत्राम यांना जनमताचा कौल
गडचिरोली निवडणूक निकाल; डॉ. होळी आणि गजबे यांची सरशी तर आत्राम यांना जनमताचा कौल

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभेच्या तीनही जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. या ठिकाणी २०१४ च्या तुलनेत यावेळी भाजपला एक जागा गमवावी लागली तर राष्टÑवादी काँग्रेसने पुन्हा आपल्या गडावर कब्जा करून भाजपकडून ती जागा हिसकावली आहे. भाजपने विद्यमान तीनही आमदारांवर विश्वास टाकत पुन्हा त्यांना निवडणूक रिंगणात उभे केले होते. यापैकी गडचिरोली व आरमोरी येथील उमेदवारांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत विजय संपादन केला.
भाजपाचे डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली मतदारसंघावर आपले प्रभुत्व कायम राखले. आरमोरी मतदारसंघातील मतदारांनी यशाचे माप कृष्णा गजबे यांच्या पदरात टाकले. तर धर्मरावबाबा आत्राम यांना जनतेने आपली पसंती दर्शविली.

अशी झाली लढत
गडचिरोली आणि आरमोरी येथे भाजपचे उमेदवारांची थेट लढत काँग्रेसच्या उमेदवारांशी झाली.
आरमोरीत काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांना मतदारांनी पुन्हा नाकारले.
गडचिरोलीत भाजपसमोर काँग्रेसच्या नवख्या उमेदवार डॉ.चंदा कोडवते टिकल्या नाही.
अहेरीत लोकसभा निवडणुकीत भाजपचे मताधिक्य घटले होते. पण राज्यमंत्रीपद गेल्यानंतरही अम्ब्रिशराव यांचे दुर्लक्ष झाले.
धर्मरावबाबा यांचा दांडगा जनसंपर्क त्यांच्या कामी आला.
अहेरीत काँग्रेसनेही उमेदवार उभा केला, पण तिहेरी लढतीनंतरही काँग्रेस-राकाँ मतविभाजन झाले नाही

Web Title: Gadchiroli Election Results 2019; Dr. Chanda Kodvate Vs Dr. Deorao Holi, Krushna Gajbe Vs Anandrao Gedam, Deepak Atram Vs Ambrishrao Atram, Dharmraobaba Atram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.