Join us
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इन रिलेशनशिपवरुन झालेल्या मतभेदावर झीनत अमान यांचं मुमताजना प्रत्युत्तर, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 16:18 IST

तुझ्या मुलांची लग्न अशा मुलींशी करशील का असा सवाल मुमताज यांनी उपस्थित केला होता. आता यावर झीनत अमान यांनी उत्तर दिलं आहे.

७० च्या दशकातील बॉलिवूडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आता सोशल मीडियावर वॉर सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच झीनत अमान (Zeenat Aman) यांनी तरुणांना एक अजब सल्ला दिला होता. लग्न करण्यापूर्वी लिव्ह इनमध्ये राहा असं त्या म्हणाल्या. यानंतर अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांनी झीनत अमान यांच्यावर निशाणा साधला होता. तुझ्या मुलांची लग्न अशा मुलींशी करशील का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता यावर झीनत अमान यांनी उत्तर दिलं आहे.

झीनत अमान हिंदुस्तान टाईम्स डिजीटलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, "प्रत्येकाचं आपापलं मत असतं. मी कधीच दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कमेंट केलेली नाही किंवा सोबत काम करणाऱ्यांच्या प्रतिमेला धक्का लागू दिलेला नाही. आता मी हे सगळं सुरुही करणार नाही."

झीनत अमान यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या मुद्द्यावर अभिनेत्री सायरो बानो यांनीही कमेंट केली होती. त्या म्हणाल्या, "मी सोशल मीडियावर नाही. त्यामुळे त्या दोघी काय म्हणाल्या किंवा त्यांच्यात कशावरुन मतभेद झाले मला माहित नाही. पण आम्ही सगळ्या जुन्या विचारांच्या आहोत. आमचा ४०-५० वर्षांपूर्वीचा काळ आहे. त्यामुळे मी याबाबतीत नक्कीच सहमत होणार नाही. मी कधीच लिव्ह इन रिलेशनशिपच्या बाजूने बोलणार नाही. माझ्यासाठी तर हे माझ्या डोक्यावरचं आणि नकारात्मक आहे."

टॅग्स :मुमताजझीनत अमानबॉलिवूड