Join us

अखेर तेच घडलं!! धनश्री वर्मा-चहलच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब; आज अंतिम सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:57 IST

दोघांना आज मुंबईतील बांद्रा स्थित कौटुंबिक न्यायालयात बोलवण्यात आलं आहे.

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma)यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. अखेर आज दोघांचा कायदेशीररित्या घटस्फोट होणार आहे. दोघंही येत्या तासाभरात चार वाजता बांद्रा येथील कौटुंबिक न्यायालयात पोहोचणार आहेत. तिथे औपचारिकरित्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या करत ते वेगळे होणार आहेत.

एबीपी न्यूज रिपोर्टनुसार, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघांना आज मुंबईतील बांद्रा स्थित कौटुंबिक न्यायालयात बोलवण्यात आलं आहे. चार वाजताची वेळ देण्यात आली आहे. दोघंही न्यायमूर्तींसमोर हजर होतील आणि कायदेशीररित्या विभक्त होतील. आपसी सहमतीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान दोघांनी सोशल मिडिया क्रिप्टिक पोस्टही शेअर केल्या आहेत.

 

धनश्री डान्सर आणि कंटेंट क्रिएटर आहे. २२ डिसेंबर २०२० साली धनश्री आणि चहल यांनी लग्नगाठ बांधली. त्यांचे रील्स, डान्स व्हिडिओ नेहमी व्हायरल व्हायचे. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. लग्नानंतर ४ वर्षातच दोघंही घटस्फोट घेत आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी हार्दिक पांड्या आणि नताशा यांचाही घटस्फोट झाला होता. 

टॅग्स :युजवेंद्र चहलसेलिब्रिटीघटस्फोटमुंबईसोशल मीडिया