Join us

"तू फक्त तुझ्यातल्या 'माणूसकीने'...", पॅडी कांबळेची सूरज चव्हाणच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 17:58 IST

Suraj Chavan And Paddy Kamble : बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणचे आणि पॅडी कांबळेचे पहिल्या दिवसापासून चांगले संबंध पाहायला मिळाले. आज सूरजच्या वाढदिवसानिमित्त पंढरीनाथ कांबळेने व्हिडीओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा सूरज चव्हाण विजेता ठरला आहे. या शोमधून तो घराघरात पोहचला आहे. शो जिंकल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. बिग बॉसच्या घरात त्याचे आणि पॅडी कांबळेचे पहिल्या दिवसापासून चांगले संबंध पाहायला मिळाले. आज सूरजच्या वाढदिवसानिमित्त पंढरीनाथ कांबळेने व्हिडीओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ते दोघे पहिल्यांदाच भेटले होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली होती.सूरजला मिळणारे यश पाहून पॅडी दादाला अभिमान वाटला आणि त्याचे डोळे पाणावले होते. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की,  आपल्या आयुष्यात अनेक माणसं येत जात असतात परंतु काही माणसं अशी येतात की ती कायमची मनात घर करून जातात. ‘सूरज चव्हाण’ हे नाव माझ्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं होवून जाईल याचा मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता. बिग बॉसच्या घरात असताना तुझ्या सोबत जे काही थोडे फार क्षण मला घालवता आले ते मी कधीही विसरू शकत नाही. 

त्याने पुढे लिहिले की, आपलं शिक्षण किती? आपली आर्थिक परिस्थिती काय? आपण कलाकार म्हणून कसे आहात? आपण चार चौघात कसे राहतो, कसे वागतो? याचा आपण रोजच्या जगण्यात किती तरी वेळा विचार करत असतो. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अक्षरशः फाट्यावर मारून तू फक्त तुझ्यातल्या ‘माणूसकीने’ संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकतो. तेव्हा तुझ्यातल्या माणूसपणाचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही. तुला आज यशाच्या शिखरावर पाहून उर अभिमानाने भरून येतो. तू कमावलेलं हे यश आणि तू जिंकलेलं महाराष्ट्रातील प्रत्येक मन हे कायम तुझ्यासोबत राहो, याच तुझ्या वाढदिवसानिमित्त निम्मित तुला शुभेच्छा! तुझाच, पॅडी दादा.

टॅग्स :बिग बॉस मराठीभात