Join us
Daily Top 2Weekly Top 5

Yo Yo Honey Singh : सेल्फी घेतली अन् चाहता पडला पाया, पाहा हनी सिंगने काय केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 15:06 IST

सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आपल्या हटके स्टाइल आणि रॅपसाठी ओळखला जाणारा प्रसिद्ध गायक म्हणजे हनी सिंग. काही काळ बॉलिवूडपासून दूर राहिल्यानंतर हनीने संगीतविश्वात दमदार पुनरागमन केलं आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या त्याच्या गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. हनी सिंगचा एक मोठा चाहतावर्ग आज देशभरात आहे.  सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये एका चाहत्याचे थेट हनी सिंगचे पायच पकडले. यावर हनी सिंगच्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

यो यो हनी सिंग अलीकडेच विमानतळावर दिसला. यावेळी एका चाहत्याने हनीसोबत सेल्फी घेतला आणि थेट त्याच्या पाया पडण्यासाठी पुढे गेला. पण, तेवढ्यात हनी सिंग मागे झाला आणि चाहत्याची गळाभेट घेतली. तसेच चाहत्याला त्याने 'अरे अजून इतका म्हातारा नाही मी' असेही म्हटलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

हनी सिंगने आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. बॉलिवूडमध्ये त्याची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. हनी सिंगच्या गाण्यांची जितकी चाहत्यांमध्ये चर्चा होत असते, त्याच्यापेक्षा कैकपटीने त्याच्या पर्सनल लाइफची चर्चा रंगताना पाहायला मिळते. आपल्या गाण्यातून हनी सिंगनं अफाट लोकप्रियता तर मिळालीच, याशिवाय ऐश्वर्यही मिळालं. मात्र हनी सिंग जेव्हा आजारी पडला तेव्हा त्याला त्याच्याकडच्या सर्व गोष्टी विकाव्या लागल्या होत्या. आजारपणातून बरं झाल्यानंतर हनी सिंह पुन्हा कामाला लागला आहे. आता पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकण्यासाठी हनी सिंग सज्ज आहे.  

टॅग्स :हनी सिंहसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडिया