Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीरने सुरु केलं 'रामायण' चं शूट, यश अन् सनी देओल कधी होणार जॉईन? अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:19 IST

'रामायण' मध्ये केजीएफ स्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे. तर सनी देओल हनुमान असणार आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayan) सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे तर साई पल्लवी सीतामातेच्या भूमिकेत आहे. नुकतंच रणबीर आणि साई पल्लवीने सिनेमाचं पहिलं शेड्युलही पूर्ण केलं. शूटनंतर रणबीरचे क्रू आणि चाहत्यांसोबत काही फोटोही व्हायरल झाले होते. दरम्यान यश (Yash) आणि सनी देओलबद्दल (Sunny Deol) काहीच अपडेट आलं नव्हतं जे आता समोर आलं आहे.

'रामायण' मध्ये केजीएफ स्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे. तर सनी देओल हनुमान असणार आहे. हे दोघंही शूटिंगला कधी सुरुवात करणार असाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, यश डिसेंबर महिन्यात 'रामायण'च्या सेटवर येणार आहे आणि शूटिंगला सुरुवात करणार आहे. मुंबईतच फिल्म सिटीमध्ये 'रामायण' चा सेट आहे तिथे शूट पार पडणार आहे. सनी देओल मात्र थेट पुढील वर्षीच 'रामायण'च्या क्रू ला जॉईन होणार आहे.

केजीएफ स्टार यश सध्या गीतू मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्झिक' सिनेमाचं शूट करत आहे. याचा एक मोठा भाग शूट झाल्यानंतर तो 'रामायण' च्या शूटसाठी जाणार आहे. यश 'रामायण' सिनेमाच्या निर्मात्यांपैकीही एक आहे. त्यामुळे तो सिनेमासाठी दुहेरी भूमिका पार पडणार आहे. पुढील वर्षीच्या बहुचर्चित सिनेमांपैकी हा सिनेमा असणार आहे.

'रामायण' मध्ये रणबीर, साई पल्लवी, यश, सनी देओल यांच्याशिवाय अरुण गोविल, लारा दत्ता, इंदिरा क्रिश्ना, कुणार कपूर, अजिंक्य देव यांचीही भूमिका आहे. 

टॅग्स :यशरणबीर कपूरसनी देओलबॉलिवूडरामायण