Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pamela Chopra : यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचं निधन, 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 12:23 IST

पामेला चोप्रा प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार होत्या.

प्रसिद्ध फिल्ममेकर यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या पत्नी पामेला चोप्रा (Pamela Chopra) यांचं आज निधन झालं. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानेयशराज कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पामेला प्रसिद्ध गायिका होत्या. यशराज फिल्म्समध्ये त्यांनी अनेक गाण्यांना संगीत दिलं. याशिवाय त्यांनी लेखिका, ड्रेस डिझायनर, सहनिर्मात्या म्हणूनही काम पाहिलं. आज 20 एप्रिल रोजी त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या पश्चात मुलगा आदित्य चोप्रा, सून राणी मुखर्जी आणि छोटा मुलगा उदय चोप्रा आहेत.

बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक सिनेमे देणाऱ्या यश चोप्रा यांनी 1970 मध्ये पामेला यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांचे अरेंज मॅरेज झाले होते. कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. पामेला यांना सुरुवातीला यश चोप्रा अजिबातच पसंत नव्हते. एक दिवस यश चोप्रा यांचे मोठे भाऊ बी आर चोप्रा आणि त्यांची पत्वी दिल्लीत गेले होते. त्यांनी यश चोप्रासाठी पामेला यांचा हात मागितला. दोन्ही कुटुंबात चर्चा झाली आणि लग्न ठरलं. पारंपारिक पद्धतीने अगदी वाजतगाजत हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर एका वर्षातच आदित्य चोप्राचा जन्म झाला. तर 1973 साली त्यांनी उदय चोप्राला जन्म दिला. 

शेवटपर्यंत दिली पतीची साथ

यश चोप्रा यांनी जेव्हा स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरु करण्याचा निर्णय घेतला तेव्हा पामेला यांनी त्यांची साथ दिली. 1974 मध्ये त्यांनी यश चोप्रा प्रोडक्शन हाऊस सुरु केली. तेव्हाचे प्रसिद्ध डिस्ट्रिब्युटर आणि फायनान्सर गुलशन राय यांनी पाठिंबा दिला. 1995 मध्ये त्यांनी पहिली फिल्म 'दाग' ची निर्मिती केली. सिनेमा तुफान हिट झाला. पामेला यांनी 'कभी कभी','सिलसिला' अशा हिट सिनेमांतील गाण्यांना संगीत दिलं आहे.

टॅग्स :यश चोप्रापरिवारमृत्यूराणी मुखर्जीआदित्य चोप्रा