बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या तिच्या सुपरहिट सिनेमांसोबतच बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबतच्या प्रेमसंबंधांमुळे सातत्याने चर्चेत असते. त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चा अनेकदा माध्यमांमध्ये रंगल्या आहेत. मात्र, जान्हवीने नुकत्याच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. काय आहे जान्हवीची पोस्ट?
जान्हवीची क्रिप्टिक पोस्ट काय?
जान्हवी कपूरने नुकतीच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली, जी तिने काही वेळातच डिलीट केली. पण तोपर्यंत ही पोस्ट व्हायरल झाली होती. जान्हवीने लिहिलं होतं, "तारीख नोंद करुन ठेवा, २९ ऑक्टोबर" या पोस्टसोबतच तिने हार्टच्या इमोजीसोबत डान्स करणाऱ्या मुलीची आणि विमानाची इमोजी देखील जोडली होती. जान्हवीने पोस्ट नंतर डिलिट केली तरीही २९ ऑक्टोबरला जान्हवी तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार की कोणत्या सिनेमाची घोषणा करणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
लग्नाचा अंदाज की चित्रपटाची घोषणा?
जान्हवीच्या या एका ओळीच्या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये आणि मीडियामध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. हृदयाची इमोजी आणि "डेट सेव्ह करा" या वाक्यामुळे अनेक चाहत्यांनी हा थेट तिच्या लग्नाचा संकेत असल्याचं मानलं आहे. २९ ऑक्टोबरला जान्हवी आणि तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया विवाहबंधनात अडकणार असल्याचा अंदाज सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. तर काहींनी असा तर्क लावलाय की, जान्हवीच्या 'चालबाज इन लंडन' या चित्रपटाची घोषणा २९ ऑक्टोबरला होऊ शकते. आता या पोस्टमागचा खरा अर्थ काय, याची थोडी वाट पाहावी लागेल.
सध्या जान्हवी कपूर किंवा शिखर पहाडिया यांच्यापैकी कोणीही २९ ऑक्टोबरला नक्की काय घडणार आहे, याची अधिकृत माहिती दिलेली नाही. जान्हवी कपूर अलीकडेच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'परम सुंदरी' या चित्रपटात आणि या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात दिसली होती. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
Web Summary : Janhvi Kapoor's deleted Instagram post mentioning October 29, along with heart and travel emojis, sparks speculation about her wedding with Shikhar Pahariya. Some believe it could be a movie announcement.
Web Summary : जाह्नवी कपूर की इंस्टाग्राम पोस्ट, जिसमें 29 अक्टूबर का जिक्र है, ने शिखर पहाड़िया के साथ उनकी शादी की अटकलों को हवा दी है। कुछ का मानना है कि यह फिल्म की घोषणा हो सकती है।