Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हेरा फेरी ३' बनणार की नाही? सुनील शेट्टीने एका वाक्यात सगळंच सांगितलं, म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:08 IST

'हेरा फेरी ३' बनणार की नाही? अशा चर्चा सुरु असताना सुनील शेट्टीने एका वाक्यात या चर्चा संपवल्या आहेत. काय म्हणाला अभिनेता?

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा सिनेमा म्हणजे 'हेरा फेरी'. या सिनेमाचा तीसरा भाग अर्थात 'हेरा फेरी ३' ची (hera pheri 3) सर्वांना उत्सुकता होती. काहीच दिवसांपूर्वी सिनेमाचा मुहुर्त शॉट पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट त्यांच्या वेशभुषेत दिसली. सर्व काही आलबेल सुरु असताना अचानक 'हेरा फेरी ३'मधून परेश रावल (paresh rawal) यांनी एक्झिट घेतली आणि सर्व चाहत्यांची निराशा झाली. अखेर याविषयी नुकतंच सुनील शेट्टीने (sunil shetty) एका मुलाखतीत मौन सोडून एका वाक्यात विषय संपवला आहे.

'हेरा फेरी ३' बद्दल काय म्हणाले सुनील शेट्टी काय म्हणाले

सुनील शेट्टीने नुकतंच अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत 'हेरा फेरी ३'बद्दल वक्तव्य केलं. सुनील शेट्टीने आगामी प्रोजेक्ट्सबद्दल यावेळी सांगितलं. अभिनेता म्हणाला, "आगामी प्रोजेक्ट्समध्ये वेलकम टू द जंगल हा सिनेमा आहे. हंटरचा पुढील सीझन प्राईम व्हिडीओवर येईल. त्याची मलाही उत्सुकता आहे. बाकी हेरा फेरी ३ बनणार की नाही, हे मला माहित नाही." अशाप्रकारे सुनील शेट्टीने एका वाक्यात  'हेरा फेरी ३' बद्दलच्या चर्चा संपवल्या आहेत. सुनील शेट्टीने केलेल्या विधानावरुन असं दिसतंय की, परेश रावल यांनी  'हेरा फेरी ३' सोडल्यामुळे आता या सिनेमाचं भविष्य अंधारात आहे, हेच म्हणावं लागेल.

परेश रावल यांनी सोडला  'हेरा फेरी ३'

परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला आणि सर्वांना धक्का बसला. परेश यांनी मानधनाच्या कारणामुळे सिनेमा सोडला का? अशी शक्यता व्यक्त केली जात होती. या सर्व चर्चांवर परेश रावल म्हणाले, "प्रेक्षकांच्या प्रेमाची तुलना पैशांसोबत होऊच शकत नाही. सध्या मला ही भूमिका करायची नाही इतकंच यामागचं कारण आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला पण मला खरोखरंच या घडीला ही भूमिका साकारायची इच्छा नाही असंच मी त्यांना सांगितलं. आम्ही सोबत अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत आणि यापुढेही करु. आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत आणि होणारही नाहीत."

टॅग्स :परेश रावलसुनील शेट्टीअक्षय कुमारबॉलिवूड