ओटीटी विश्वातील अत्यंत लोकप्रिय वेब सीरिज ‘पंचायत’च्या (panchayat 5) आगामी पाचव्या सीजनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी या सीरिजचा चौथा सीजन आला होता, ज्याचा शेवट एका रंजक वळणावर झाला होता. तेव्हापासूनच चाहते पाचव्या सीजनची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मने गेल्या महिन्यातच या शोची अधिकृत घोषणा केली होती आणि आता या आगामी सीजनबद्दल काही नवीन माहिती समोर आली आहे.
रिलीज डेटची चाहत्यांना प्रतीक्षा
गेल्या महिन्यात प्राईम व्हिडिओने आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली होती, ज्यामध्ये ‘पंचायत’ सीजन ५ चाही समावेश होता. ‘पंचायत’चा पाचवा सीजन याच वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये रिलीज होणार आहे. सीरिजच्या रिलीज डेटची घोषणा अद्याप झाली नसली, तरी हा सीजन याच वर्षी जुन किंवा जुलैमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची शक्यता आहे.
काय असेल पाचव्या सीजनची कथा?
पाचव्या सीजनमध्ये कथा अधिक रंजक वळण घेणार आहे. चौथ्या सीजनमध्ये अपूर्ण राहिलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या नवीन सीजनमध्ये मिळतील, असे संकेत निर्मात्यांनी आधीच दिले आहेत. याशिवाय या सीजनमध्ये 'सचिव जी' म्हणजेच अभिषेक त्रिपाठीला फुलेरा गावात एका कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. तो आपल्या एमबीएच्या स्वप्नांवर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असला, तरी गावातील राजकारणात तो कसा गुरफटून जातो, हे पाहायला मिळणार आहे.
जुनी स्टारकास्ट परतणार
पाचव्या सीजनमध्येही प्रमुख कलाकार तेच राहतील जे गेल्या चार सीजनपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. जितेंद्र कुमार पुन्हा एकदा अभिषेक त्रिपाठीच्या भूमिकेत दिसेल. यासोबतच नीना गुप्ता, रघुबीर यादव, सान्विका, फैसल मलिक आणि चंदन रॉय हे देखील आपल्या लोकप्रिय पात्रांसह पुनरागमन करणार आहेत. या सीरिजचे लेखन चंदन कुमार यांनी केले असून दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. आधीच्या चारही सीजनप्रमाणे पाचवा सीजनही प्राईम व्हिडिओवरच स्ट्रीम केला जाईल.
Web Summary : Amazon Prime's 'Panchayat' Season 5 is eagerly awaited. Expected in June/July 2026, it promises answers to unresolved questions. Abhishek faces village politics while pursuing his MBA. The original cast, including Jitendra Kumar, returns.
Web Summary : अमेज़ॅन प्राइम की 'पंचायत' सीजन 5 का बेसब्री से इंतजार है। जून/जुलाई 2026 में अपेक्षित, यह अनसुलझे सवालों के जवाब देने का वादा करता है। अभिषेक एमबीए करते हुए गाँव की राजनीति का सामना करते हैं। जितेंद्र कुमार सहित मूल कलाकार लौट रहे हैं।