Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफच्या एक्स पत्नीला डेट करत होता सनी देओल; अभिनेत्याच्या पत्नीची होती अशी रिअॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 14:50 IST

Sunny deol: एका मुलाखतीमध्ये सनी देओलने त्याच्या अफेअरचा परिणाम पत्नीवर कशाप्रकारे झाला होता हे सांगितलं.

तब्बल २२ वर्षानंतर 'गदर'चा सिक्वेल आला आणि पाहता-पाहता त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सकिना आणि तारासिंग यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांनी तितक्याच आवडीने पाहिले. त्यामुळे तारासिंगची म्हणजेच अभिनेता सनी देओल (sunny deol) याची पडद्यावरची लव्हस्टोरी तर चांगलीच हिट झाली. मात्र, सध्या या सिनेमा सोबत त्याची रिअल लाइफ लव्हस्टोरीही सध्या चर्चेत आली आहे. एकेकाळी सनी, सैफची एक्स पत्नी म्हणजेच अमृता सिंह हिला डेट करत होता. परंतु, त्यांचं लग्न काही कारणास्तव होऊ शकलं नाही. परंतु, या सगळ्या गोष्टींचा परिणाम सनी देओलच्या पत्नीवरही झाला होता. याविषयी त्याने एका मुलाखतीत भाष्य केलं होतं.

सनीला एका मुलाखतीमध्ये त्याच्या लव्ह अफेअर्सविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. 'तुझं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जातं. तेव्हा काय वाटतं?' असं त्याला विचारण्यात आलं. त्यावर, "अशा गोष्टी होतच असतात. हा खेळाचाच एक भाग आहे", असं सनी म्हणाला. ही मुलाखत ज्यावेळी झाली त्यावेळी सनी आणि पूजा यांचा साखरपुडा झाला होता. त्यामुळे 'या सगळ्या चर्चा तिच्यापर्यंत पोहोचतात का?' असंही त्याला विचारण्यात आलं. त्यावर, "या सगळ्या गोष्टी तिच्यापर्यंत पोहोचतात की नाही मला माहित नाही. पण, अशा काहीच गोष्टी घडल्या नाहीयेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी लोक सेलिब्रिटींबद्दल काय लिहितात हे सगळं मी पाहिलंय. त्यामुळे हे सगळं सहन करावच लागतं. कधी कधी उगाच वाढवून काहीही लिहिलं जातं. तेव्हा राग येतो. अशी व्यक्ती जर कधी भेटली तर त्याला मारावसं वाटतं. अजून काय करु शकतो?", असं म्हणत सनीने अमृता सिंहसोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं.

दरम्यान, सनी आणि अमृता एकमेकांना डेट करत होते. मात्र, अमृताच्या आईला हे नातं मान्य नव्हतं. तर,दुसरीकडे सनीचं पूजासोबत लग्न ठरलं. ज्यामुळे अमृता प्रचंड दुखावली होती. परंतु, सनीने अमृतासोबतचं हे नातं कधीच मान्य केलं नाही. अलिकडेच तो, अमृता आणि डिंपल कपाडिया हे तिघं एकत्र दिसून आले होते.  सध्या बॉक्स ऑफिसवर सनीचा गदर २ तुफान कमाई करत आहे. या सिनेमाने नुकताच ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. 

टॅग्स :सनी देओलसेलिब्रिटीबॉलिवूडअमृता सिंगडिम्पल कपाडिया