Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द अजित पवार' बायोपिकमध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार? अजित दादांनी भर कार्यक्रमात घेतलेलं 'या' अभिनेत्याचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:20 IST

Ajit Pawar on His Biopic: अजित पवार यांनी त्यांच्या बायोपिकबाबत एका कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं. ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला दुर्देवी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. अजित पवार हे राजकारणी असण्यासोबतच उत्तम वक्ते होते. त्यांचा मिश्किल स्वभाव हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. त्यांचे अनेक कलाकारांसोबतही मैत्रीपूर्ण संबंध होते. अजित पवार यांनी त्यांच्या बायोपिकबाबत एका कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं. ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे. 

झी गौरव चित्र गौरव पुरस्कार २०२४ या सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अवधूत गुप्ते अजित पवार यांना विचारतो "द अजित पवार नावाचा बायोपिक आला तर त्यात कोणत्या अभिनेत्याने तुमची भूमिका साकारावी?". त्यावर उत्तर देताना क्षणाचाही विलंब न करता अजित पवार यांनी शेजारीच उभ्या असलेल्या निलेश साबळेचं नाव घेतलं होतं. ते म्हणाले होते "डॉक्टरने करावं असं वाटतं". त्यांचं उत्तर ऐकून निलेश साबळेदेखील आश्चर्यचकित झाला होता. 

पुढे निलेश साबळे म्हणतो, "मी किती चांगला करायचो हे माहीत नाही पण, हे लोकांना आवडायचं. पण मला माहित नव्हतं की, दादा स्वतः बघतात. पण, आता मला कळलं आहे. त्यामुळे आता जरा जास्तच जपून करायला पाहिजे".  पुढे अजित पवार म्हणाले की, 'मी पण कधी कधी ते काय बोलतात ते बघत असतो. आम्ही पण आरशासमोर प्रॅक्टिस करत बोलत नसतो. आम्ही एकदा माईक हातात आल्यानंतर जे विचार पटतात त्या पद्धतीने बोलत असतो. परंतु ह्यांनी (निलेश साबळे) बऱ्याचदा 'या ठिकाणी, या ठिकाणी' माझी नक्कल करताना म्हटलं होतं. मी तेव्हापासून ठरवलं की, हा शब्द जेवढा कमीत कमी वेळा वापरता येईल. तुम्ही बघा त्यानंतरच्या काळात हा शब्द अजित पवारने कमी केलेला आहे. त्यामुळे डॉक्टर तुम्ही अधून मधून माझी अशी नक्कल करत चला आणि मग त्यातून मलाही कळेल, आपलं काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. आणि त्याप्रमाणे मला दुरुस्ती करता येईल". 

अजित पवारांच्या या उत्तरानंतर एकच हशा पिकला होता. आता अजित पवारांवर जर सिनेमा आलाच तर त्यात दिवंगत नेत्याची भूमिका कोण साकारणार, हे पाहावं लागेल. दरम्यान, अजित पवारांनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत कारभार सांभाळला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nilesh Sable as Ajit Pawar? Pawar himself suggested the name!

Web Summary : Ajit Pawar once jokingly suggested Nilesh Sable to play him in a biopic. Pawar appreciated Sable's mimicry, saying it helped him improve his speech. The video is now viral after Pawar's unfortunate death.
टॅग्स :अजित पवारनिलेश साबळेआत्मचरित्रमराठी चित्रपटव्हायरल व्हिडिओ